मुंबई, 4 सप्टेंबर (आ.प्र.) :
राज्यातील प्रत्येक शाळेत स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांमध्ये भेट देऊन काम करावे.
बैठका आणि आढाव्यांमधील नियाेजनाचे प्रतिबिंब शाळांत आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीत दिसले पाहिजे. यासाठी राज्यभर ‘चला शाळेत जाऊ या’ हे विशेष अभियान राबवण्यात येणार असल्याची घाेषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली.
शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ज्ञानमंदिरांचे सश्नतीकरण ही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
येथे बालभवनात आयाेजित शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिक्षण संवाद या एकदिवसीय कार्यशाळेत ते बाेलत हाेते. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, आयु्नत सचिंद्रप्रताप सिंह यांच्यासह विभागातील सर्व संचालक, उपसंचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.
पाेषण आहार, शालेय गणवेश आणि विद्यार्थ्यांच्या सुविधांबाबत तडजाेड खपवून घेतली जाणार नाही. निकृष्ट दर्जाचा पुरवठा किंवा अनियमितता आढळल्यास कठाेर कारवाई करण्याचे निर्दे श त्यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित बाबींमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता असावी यासाठी अधिकाऱ्यांनी प्रभावी व्यवस्था उभारावी, असे भुसे यांनी सांगितले. सर्व अधिकाऱ्यांनी अधिकाधिक शाळांना भेट देण्याचे नियाेजन करावे; तसेच शाळा तपासणीदरम्यान सर्व संबंधित माहिती साेबत बाळगावी, अशी सूचना देओल यांनी केली. विद्यार्थी शाळेतून बाहेर पडल्यानंतर सक्षम झाला पाहिजे. शाळांच्या सक्षमीकरणासाठी स्थानिक पातळीवरील विविध विभागांच्या निधीसाठी विभागातील अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याची सूचना सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी केली. यावेळी उपस्थित शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक तसेच विभागातील अधिकाऱ्यांनी आपले प्रत्यक्ष अनुभव कथन करून शाळांमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी सूचना केल्या.