बेंगळुरू, 3 सप्टेंबर (वि.प्र.) :
साध्या क्लाउड-आधारित डॅशबाेर्डच्या माध्यमातून रुग्णांना सर्पदंशावरील प्रतिविष (खपींर्ळींशपेा) कुठे उपलब्ध आहे, याची माहिती देणारे डिजिटल व्यासपीठ, तातडीच्या प्रथमाेपचारासाठी मार्गदर्शन आणि रुग्णालयांना सूचना देणारे कृत्रिम बुद्धिमत्ता (अख) आधारित नेटवर्क अशा नावीन्यपूर्ण संकल्पना कर्नाटकातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या छरसरींहेप डपरज्ञशलळींश खपर्पेींरींळेप उहरश्रश्रशपसश मध्ये मांडल्या.
16 ऑगस्ट राेजी खपवळरप खपीींर्ळीीींंश ेष डलळशपलश (खखडल) येथे झालेल्या छरसरींहेप 2026च्या अंतिम फेरीत सहभागी झालेल्या 10 अंतिम संघांपैकी छॠच (छशीुेींज्ञ षेी पींर्ळींशपेा ॠीळव रपव चेपळीेींळपस) या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आणि 1.5 लाख रुपयांचे पारिताेषिक मिळवले. या संघाने एक डिजिटल प्लॅटफाॅर्म विकसित करण्याची संकल्पना मांडली आहे. साध्या क्लाउड-आधारित डॅशबाेर्डद्वारे रुग्णांना प्रतिविष उपलब्ध असलेले रुग्णालय शाेधता येईल. रुग्णालयांना प्रतिविषाचा साठा तातडीने अद्ययावत करता येईल.
त्यामुळे डाॅक्टर आणि रुग्णालय प्रशासनाला विविध केंद्रांमधील प्रतिविषाची सध्याची उपलब्धता तसेच अतिदक्षता विभागाची क्षमता एका ठिकाणी पाहता येईल. विलंब कमी करण्याचा प्रयत्न या संकल्पनेचा मुख्य उद्देश उपचारातील विलंब, रुग्णांना अनावश्यकपणे एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलवणे आणि जीवनरक्षक साधने उपलब्ध आहेत की नाहीत हे जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांना स्वतंत्रपणे फाेन करण्यात जाणारा वेळ कमी करणे हा आहे. कखतउक या संघाने दुसरा क्रमांक पटकावला.
या संघाने थहरीीििं, डचड, खतठ व्हाॅइस काॅल्स आणि लॅमिनेटेड कार्ड्स यांचा वापर करून जनजागृती आणि प्रतिबंधात्मक संदेश पाेहाेचवण्याची संकल्पना मांडली. या माध्यमातून प्रथमाेपचाराची माहिती देणे, सापाची ओळख पटवण्यास मदत करणे, रुग्ण रुग्णालयात पाेहाेचण्यापूर्वीच संबंधित रुग्णालयाला सूचना देणे, आवश्यक साधनसामग्रीशी संपर्क साधून देणे आणि उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांशी संपर्क ठेवणे यांचा समावेश आहे.
आयाेजकांच्या मते, या उपक्रमात शालेय शिक्षण, स्थानिक भाषांमधील संदेश, प्रतिविषाची उपलब्धता असलेल्या रुग्णालयांकडे रुग्णांना वळवणे (ीर्शीेीींळपस) आणि सर्पदंशातून बचावलेल्या व्यक्तींच्या अनुभवकथा यांचाही समावेश आहे. यामुळे सर्पदंशाच्या घटना राेखणे, तसेच त्यावरील तातडीच्या उपचारांना अधिक प्रभावी बनवणे शक्य हाेईल. रुग्णालयात तातडीने उपचाराला प्राधान्य झीेक्षशलीं ठरज्ञीहर या संघाने तिसरा क्रमांक मिळवला.
सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाला वैद्यकीय उपचार मिळण्यास हाेणारा धाेकादायक विलंब कमी करण्यावर आधारित समुदाय-केंद्रित वर्तनबदल माेहीम या संघाने प्रस्तावित केली. यासाठी पथनाट्य, रेडिओ, घराघरात जनजागृती, गावातील मार्गांचे नकाशे, प्रशिक्षित स्वयंसेवक आणि आशा (डक) कार्यकर्ते, तसेच तातडीने रुग्णालयात संदर्भीत करण्यासाठी बहुभाषिक हेल्पलाइन यांचा वापर करण्याची याेजना मांडण्यात आली आहे. या उपक्रमांचा केंद्रबिंदू एकच आहे सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाला याेग्य उपचार मिळण्यात हाेणारा प्रत्येक अनावश्यक विलंब कमी करणे आणि जीव वाचविण्याची शक्यता वाढवणे.