वाच्यार्थ : ज्याप्रमाणे फुलात गंध, तिळात तेल, लाकडात अग्नी, दुधात तूप, उसात (गाेडी) गूळ दडलेला असताे. त्याप्रमाणेच मानवाच्या शरीरामध्ये परमात्म्याचा अंश असलेला आत्मा विद्यमान असताे. त्याचे दर्शन (आत्मबाेध) हे सद्सद्विवेकबुद्धीद्वारे घ्यावे. (त्याला जाणावे.) भावार्थ : मानवी शरीर व आत्मा यांचा संबंध इथे चाण्नयांनी सांगितला आहे.
1. फुलात सुगंध ः फूल उमलले की सुगंध दरवळताे; कारण संपूर्ण फुलातच ताे बंदिस्त असताे.
2. तिळात तेल ः तिळाच्या बिया या तेलबिया असतात. घाण्यात तीळ टाकून ताे फिरविल्यानंतर तेल आणि ढेप दाेन्ही वेगवेगळे मिळतात.