आरोग्यदायी धुपाने घरातील वातावरण निरोगी राहते

    04-Sep-2026
Total Views |

dhup 
भारतीय संस्कृतीत धुपन ही एक प्राचीन पद्धत आहे. फक्त धार्मिक किंवा पारंपरिक रीतिरिवाज म्हणून नव्हे तर यामागे ठाेस वैज्ञानिक कारणेही दडलेली आहेत. सकाळी आणि संध्याकाळी घराच्या आत व आवारात धुपन केल्याने वातावरण निराेगी, ताजेतवाने व राेगप्रतिबंधक राहते.
 
धुपनाचे महत्त्व
धुपनामुळे वातावरणातील आर्द्रता कमी हाेते आणि परिसर काेरडा राहताे.
काेरड्या वातावरणात डास, कीटक आणि सूक्ष्मजंतूंचा प्रादुर्भाव कमी हाेताे. यामुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा धाेका कमी हाेण्यास मदत हाेते. नैसर्गिक धुपन द्रव्ये धुपनासाठी आपल्या घरी सहज उपलब्ध हाेणारी काही नैसर्गिक द्रव्ये वापरता येतात.
 
कडू निंबाची पाने : जंतुनाशक गुणधर्म लाभलेले.
 
तुळशीची पाने : शुद्धीकरण व औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण.
 
एरंडाची पाने : वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी उपयाेगी.
 ही पाने वाळवून धुपन द्रव्यांत मिसळल्यास त्याचा परिणाम अधिक प्रभावी हाेताे.
 
धुपनाचे फायदे
 घरातील व आजूबाजूच्या हवेत शुद्धता निर्माण हाेते.
 डास व इतर कीटकांचा त्रास कमी हाेताे.
 औषधी धूर शरीर व मनाला ताजेतवाने ठेवताे.
 परंपरा, आराेग्य आणि निसर्गस्नेही जीवनशैली यांचा संगम साधताे.
धुपन ही फक्त एक जुनी परंपरा नसून आधुनिक काळातही उपयुक्त अशी आराेग्यसंवर्धनाची पद्धत आहे. सकाळसंध्याकाळ आपल्या घरात व आवारात धुपन करण्याची सवय लावा आणि आपल्या कुटुंबाचे आराेग्य सुरक्षित ठेवा.
 
धुपन ही केवळ पारंपरिक प्रथा नसून त्यामागे वैज्ञानिक आधार आहे. आपल्या घर-आवारात नियमित धुपन केल्याने हवा स्वच्छ राहते, डास-कीटकांचा उपद्रव कमी हाेताे आणि निराेगी वातावरण टिकून राहते. निसर्गाने दिलेली झाडे निंब, तुळस, एरंड हीच आपल्या आराेग्याची खरी संपत्ती आहे.