मुंबई, 3 सप्टेंबर (आ.प्र.) :
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत देण्यास मदत व्हावी, या उद्देशाने केंद्राच्या धर्तीवर राज्यात साॅफ्ट लाेन याेजना लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव तत्काळ मंत्रिमंडळासमाेर सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी साखर कारखान्यांसाठी साॅफ्ट लाेन धाेरण आणि उपपदार्थ निर्मिती धाेरण निश्चितीबाबत बैठक झाली.
साखर कारखान्यांची आर्थिक क्षमता वाढवण्यासाठी केवळ साखरेवर अवलंबून न राहता उपपदार्थांच्या निर्मितीला चालना देणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी सहकारी साखर कारखान्यांमधून तयार हाेणाऱ्या विविध उपपदार्थांसाठी सर्वसमावेशक धाेरण ठरवण्याची सूचना केली. या धाेरणामुळे कारखान्यांमध्ये साैर ऊर्जा, सहवीज निर्मिती, इथेनाॅल, मल्टिफीड, 2ॠ इथेनाॅल, सीबीजी, हरित हायड्राेजन, बायाे बिटुमिन, जैव रसायने आणि एसएएफ या घटकांच्या निर्मितीस गती मिळणार आहे.
साॅफ्ट लाेन याेजनेमुळे साखर कारखान्यांची आर्थिक चणचण दूर हाेण्यास मदत हाेईल. शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे वेळेत देणे शक्य हाेणार आहे. तसेच, येत्या गाळप हंगामाची पूर्वतयारी विनाअडथळा पूर्ण करता येईल.