पायांवर सूज येत असल्यास काय काळजी घ्यावी

    30-Sep-2026
Total Views |

Legs 
आपलं आपल्या शरीराकडे लक्ष असलं तर अनेक बारीक सारीक बदल आपल्याला आराेग्याच्या तक्रारी सांगतात. काही आजारांची लक्षणं वेळेत दिसतात. शरीर कुरकुरत असतं पण आपलं लक्ष नसतं. किंवा वरवर मलमपट्टी करुन आपण कामं करताे. धकवून नेताे. महिला तर यात उस्ताद. हाेता हाेईताे दवाखान्यात जात नाहीत. आजार अंगावर काढतात. आणि मग घाेळ असा हाेताे की आजार विकाेपाला गेला की डाॅक्टर गाठला जाताे. पण अनेकदा आपली त्वचा, आपले केस, पाय, पायावरची सूज, तुटणारी नखं, पित्त, डाेकेदुखी हे आजार की आजाराची लक्षणं हेच अनेकदा कळत नाही. त्यासाठी वेळेत डाॅक्टरांकडे जायला हवं.
 
पायात गाेळे :
पायांच्या मसल्समध्ये वेदना हाेणं, खेचल्या सारखं वाटणं, मॅग्नेशियमची कमतरतेचे संकेत असू शकतात. याची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात मॅग्नेशियम युक्त पदार्थांचा समावेश करा. क्रॅम्प्स कमी हाेतात. या पदार्थांचा आहारात समावेश करण्याआधी डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
 
 पायांवर सूज :
जर पायांवर सतत सूज येत असेल, पाय फुगल्या सारखे वाटत असतील तर तुम्हाला हायपरटेंशन, किडनीची समस्या, लिव्हरची समस्या, हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
म्हणून वेळीच चाचण्या करून घ्या.
 
 स्पाइडर वेन्स :
पायांमध्ये जाळ्याप्रमाणे खुणा दिसतात त्याला स्पाइडर वेन्स असे म्हणतात.
हाय इस्ट्राेजन लेव्हल, बर्थ कंट्राेल पिल्स किंवा गर्भावस्थेमुळे असे हाेऊ शकते. डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
 
 टाचांना भेगा :
टाचांना भेगा पडणं म्हणजे व्हिटामीन बी-12 व्हिटामीन बी-3, यांची कमतरता असू शकते.
ओमेगा-3 ची कमतरता भासते. व्हिटामीन्स, ओमेगा-3 फॅटी एसिड्सची यांचा आहारात समावेश करा. यामुळे त्वचेलाही फायदे मिळतात.
 
 पायाला मुंग्या येणं :
अचानक पायांमध्ये झिणझिण्या येणं, पाय सुन्न पडणं व्हिटामीन बी12 कमतरतेची लक्षणं आहेत.
खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करा. व्हिटामीन बी-12 सप्लिमेंट्स तुम्ही घेऊ शकता. हिरव्या भाज्या, फळं, दूध, दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा.
 
 पाय थंड पडणं :
आयाेडीनच्या कमतरतेमुळे पाय थंड पडतात. एनिमियामुळे अशी स्थिती उद्भवू शकते. याेग्य प्रमाणात आयाेडीनचे सेवन केल्यास हा त्रास कमी हाेताे.