मुंबई, 29 सप्टेंबर (आ.प्र.) :
महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्य खादी व ग्रामाेद्याेग मंडळाच्या वतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात खादी व ग्रामाेद्याेग उत्पादनांचे प्रदर्शन आयाेजिण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मुख्य सचिव राजेश अग्रवाल, खादी ग्रामाेद्याेग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, उद्याेग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगन आणि उद्याेग विकास आयु्नत कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शनात मध संचालनालयाचा मधुबन मध, खादी वस्त्रे, घरगुती पापड, लाेणची, साैंदर्य प्रसाधने, हळद, विविध ड्रायफूटस, काेल्हापुरी चप्पल यासह विविध उत्पादनांची खरेदी करता येणार आहे. महिला बचत गट; तसेच ग्रामीण भागातील उद्याेजकांनी तयार केलेल्या उत्पादनांनाही या प्रदर्शनातून बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात हे प्रदर्शन 1 ऑक्टाेबरपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहणार आहे.