मुंबई, 29 सप्टेंबर (आ.प्र.) :
बीड जिल्ह्यातील भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरापहाडी (केंद्र जरूड) येथील चिमुकल्या विद्यार्थिनींच्या बाॅटल माईक साेशल मीडिया रिपाेर्टिंगची उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालक मंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने दखल घेतली.
आम्हाला अधिकारी व्हायचय, तुम्ही फ्नत शिक्षक द्या... अशी हाक देणाऱ्या या मुलींना त्यांनी तातडीने प्रतिसाद दिला. उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभागाने तात्काळ कारवाई केली. वरिष्ठांच्या आदेशानुसार शिक्षक शिवाजी जाेगदंड यांची हिवरापहाडी शाळेत नियु्नती करण्यात आली.
हिवरापहाडी येथील दुर्गम भागातील शाळेत गेल्या काही दिवसांपासून गणित, विज्ञान आणि संगणकासारख्या महत्त्वाच्या विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नव्हते. यावर ताेडगा काढण्यासाठी येथील मुलींनी पाणी पिण्याच्या प्लॅस्टिक बाॅटलचा माईक बनवून थेट वर्गातूनच अभिरूप बातमीपत्र सादर केले हाेते. हा भावनिक व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाला. त्याची गांभीर्याने दखल घेत पवार यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने उपाययाेजना करण्याचे निर्देश दिले.
वरिष्ठ स्तरावरून थेट आदेश आल्यानंतर प्रशासनाने तात्काळ पावले उचलत शिक्षक शिवाजी जाेगदंड यांची हिवरापहाडीच्या शाळेत नियु्नती करण्याचा आदेश दिला. त्या आदेशानुसार ते शाळेत रुजू झाले आहेत.