गोदवलेकर महाराज

आपल्या घरात शुद्ध वातावरण असावे

    30-Sep-2026
Total Views |

GondavlekarMaharaj 
भगवंताची उपासनाŸ। दूर करी सर्व यातना।। चित्ताची स्थिरता। भगवंताच्या उपासनेत निश्चितता।। देह जरी जीर्ण ार। तरी वासनेचा जाेर अनिवार। हे जाणून चित्ती। एक भजावा रघुपती।। हृदयी करता भगवंताचे ध्यानŸ। नामाविण उच्चार दुजा न जाण। त्यात व्यवहाराचे जतनŸ। न दुखवावे काेणाचे अंतःकरण। असा नेम ज्याच्यापाशी। राम तेथील रहिवाशीŸ।। मी रामाचा, रामा तू माझाŸ। हाच अखंड असावा हव्यासŸ।। ऐसे ध्यावे रामालाŸ। की जे जीव प्यार झाले मला।। आता याहून दुजे न सांगणे काहीŸ। रामविण जगू नाहीŸ।। जे जे हाेणार ते हाेतच जाते। ते भगवंताच्या इच्छेने घडतेŸ। ऐसे आणणे मना। याचे नाव उपासना।। अखंड रामसेवा ज्याला लाभलीŸ। धन्य धन्य त्याची माउली।। स्वार्थरहित रामसेवा। याहून लाभ दुजा न जीवा।।
 
राम ठेवा मनी।। ताे ध्यात जावा मानसपूजनी।। वाचेने भगवंताचे नावŸ। कायेने भगवंताची सेवा। चित्ती भगवंताचे ध्यान। आपण राहावे रामार्पण। याहून अन्य सेवा काेणतीहि न जाण।। मनाला लावून घ्यावे सुंदर वळण। जेणे राम साहाय्य करील जाण।। उपासना असावी बळकट । तेथे नसावी कशाची अट।। उपासनेचा असावा जाेरŸ। ज्याने हाेईल मन स्थिरŸ।। आपले जीवन ज्याचे हातीŸ। त्याची नेहमी ठेवावी संगति।। जे जे काही मी करावे। त्याला परमात्मा साक्षी हे जाणावेŸ।। मनी न साेडावा धीर। आहे म्हणावे माझा रघुवीर।। करावे भगवंताचे चिंतन। हाेईल स्वतःचे विस्मरण।। सर्व आहे रामाधीनŸ। आपण निमित्ताला कारण।। रामावर ठेवावे चित्त। जैसे प्रपंची असावे वाटते वित्तŸ।। उपासनेचे नर। त्यांनी राहावे खबरदार।। आजवर केली भगवंताची उपासना। पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा।। सर्वांचे ऐकावे। परी उपासनेपासून दूर न व्हावे।। राम माझा देता घेता। राम माझ्या भाेवता।। रामविण जगी दुजे। न ठेवावे आणिक परते।। एक सद्गुरुआज्ञा प्रमाण। हीच रामसेवा जाण।। थाेर थाेर ऋषिमुनी। यति संत साधु यांनी।
 
एकच केले खास। रामावाचून न राहू दिले जीवास।। ठेवावा रामावर पूर्ण विश्वास। न करावे उपासतापास।। उपासनेत राहावे आपणŸ। हेच रामाचे सान्निध्य जाण।। स्वार्थरहित सेवा। तीच पावे देवाधिदेवा।। जे जे हाेते काही। ते ते राम करताे पाही। हा एकच विश्वास। समाधानाचा मार्ग सत्य खास।। जेथे परमात्म्याची सत्ता। तेथे न चाले काेणाचे सर्वथा। म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये। समाधान राखीत जावे।।