श्री दासबोध नित्यपाठ

परहितकारी परशोकहारी । पुरुषार्थे जगमित्र ।।१।।

    03-Sep-2026
Total Views |

RamdasSwami 
सद्विद्याप्राप्त माणसाला परमार्थाची गाेडी असते त्यामुळे श्रुती, स्मृती, उपनिषदे अशा धर्मगं्रथांचे त्याला ज्ञान असतेच पण त्याचबराेबर राेजच्या व्यवहारात सावधपणे आणि प्रसंग ओळखून कसे वागावे हेही ताे जाणताे. काेणाला मानसन्मान देऊन आदर दाखवावयाचा तर काेणा लबाड माणसाची लबाडी हुषारीने ओळखावयाची हे त्याला बराेबर समजते.
 
सत्य आणि नेमके बाेलणारा, बाेलल्यासारखेच चालणारा, चपळ, काैशल्यवान असा पुरुष आपली साधकवृत्ती व ज्ञानार्जनाची प्रवृत्ती साेडत नाही.
 आगम आणि निगम म्हणजेच शरीर आणि आत्मा यांचे परस्परसंबंधाचे, जीवशिवाच्या नात्याचे त्याला सूक्ष्म ज्ञान असते. ताे भक्तीसुद्धा अनेक मार्गांनी करीत असताे. कधी ताे पुरश्वरणे करताे तर कधी तीर्थयात्रा, कधी जप, तर कधी शरीरकष्टाचे तप, मात्र त्याचा साधनेचा मार्ग निश्चित झालेला असल्याने त्याला सत्यस्वरूपाविषयी काेणताही संदेह राहिलेला नसताे. त्याच्या वासना क्षीण झालेल्या असल्यामुळे ताे सदैव तृप्त व समाधानी असा याेगी स्वरूप बनलेला असताे.
 
मनातूनच विरागी झालेला असल्याने त्याचे वागणे बाेलणे साैम्य, शुद्ध, सात्विक आणि निष्कपट असते. ताे निर्व्यसनी असताे आणि या सर्व सद्गुणांमुळे लाभणारी मन:शांती त्याच्या मुखावरही प्रगट हाेते. त्यामुळे त्याच्या दर्शनानेही सर्वांना निरातिशय प्रसन्नतेचा लाभ हाेताे. असा वितरागी असूनही त्याला कला व संगीतात ज्ञान आणि रस असताे.