5. कष्ट करून प्रामाणिकपणे मिळविलेले धन ः माणूस मुळात आळशी असताे. कष्ट न करता किंवा आयत्या गाेष्टी त्याला पाहिजे असतात. ‘झटपट पैसा’ किंवा वाममार्गाने मिळणारा ‘जास्तीचा’ पैसा चैनीसाठी त्याला हवा असताे. त्यासाठी ताे तस्करी, भ्रष्टाचारालाही प्रवृत्त हाेताे. प्रामाणिकपणे गरजेपुरतेच धन मिळविणाऱ्या व्य्नती विरळाच! अशा व्य्नती थाेड्यात गाेडी मानतात. धन हे जीवन जगण्याचे केवळ साधन मानतात.
बाेध ः तना-मनाची शुद्धता, इंद्रियदमन ‘सर्व भुतेषू’ दयाबुद्धी, प्रामाणिकपणे मिळविलेले धन या गाेष्टी मनुष्यजन्माची सार्थकता साधण्यासाठी, जन्ममरणाच्या फेऱ्यातून मु्नती मिळविण्यासाठी आवश्यक आहेत.
संतमहंतादी सत्पुरुषांमध्ये या गाेष्टी आढळतात.