मुंबई, 2 सप्टेंबर (आ.प्र.) :
महाभूमी स्टॅक प्रणालीमुळे राज्यातील सर्व जमिनीच्या मालकी ह्नकाबाबत एका क्लिकवर माहिती उपलब्ध हाेणार असल्याने राज्यातील गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्य्नत केला.
राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या भूमी प्रशासनासाठीच्या महाभूमी स्टॅक प्रणालीचे राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर लाेकार्पण करण्यात आले. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी या प्रणालीचे सादरीकरण केले.
जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आणि व्यवहारानंतर अनेक बाबतीत नागरिकांना महाभूलेख, महाभूनकाशा, आयडीआरएस यासारख्या विविध प्रणालींची मदत घ्यावी लागते. या सर्व विखुरलेल्या प्रणालीचे एकत्रीकरण करून दहा प्रमुख भूमी सेवा श्रेणींसाठी एकच एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार महाभूमी स्टॅकच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्याच्या महसूल आणि जमीनविषयक सुधारणांमधील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्य शासनाने ईज ऑफ लिव्हिंग आणि ईज ऑफ डुइंग बिझनेस धाेरण स्वीकारले आहे. महाभूमी स्टॅक प्रणाली या धाेरणाच्या अनुषंगानेच आहे. महसूल विभागाने या प्रणालीचा प्रभावीपणाने वापर करावा. त्याचबराेबर नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.