काेथिंबीर
1. पचनशक्ती वाढते - काेथिंबीर पाेटाच्या समस्या दूर करून पचनशक्ती वाढवते. ताज्या काेथिंबीरच्या पानांना ताकासाेबत प्यायल्याने अपचन, मळमळीच्या समस्यांपासून आराम मिळताे. काेथिंबीर, हिरवी मिरची, नारळ आणि अदरकची चटणी बनवून खाल्ल्याने, अपचनामुळे पाेटात हाेणाऱ्या वेदनांपासून आराम मिळताे. तसेच अर्ध्या ग्लास पाण्यात दाेन चमचे काेथिंबीर टाकून प्यायल्याने देखील पाेटदुखीपासून आराम मिळताे.
2. अशक्तपणा हाेईल दूर - जर तुम्हाला खूप थकल्यासारखे, अशक्त वाटत असेल किंवा चक्कर येत असतील. तर दाेन चमचे काेथिंबीरीच्या रसामध्ये दहा ग्राम मिश्री (खडीसाखर) आणि अर्धी वाटी पाणी मिसळून सकाळ-संध्याकाळ प्यायल्याने थकवा, अशक्तपणा कमी हाेताे.
3. श्वासाचे राेग हाेतील दूर - काेथिंबीर श्वासासंबंधी राेगांना दूर करण्यासाठी खूप फायदेशीर असते.
खाेकला, दमा किंवा श्वास घेण्यास त्रास हाेत असल्यास काेथिंबीर आणि मिश्री (खडीसाखर) समान प्रमाणात मिळवून बारीक करा. हे मिश्रण एक चमचा भाताच्या पाण्यात मिळवून राेग्याला पाजा. काही दिवस नियमीत असे केल्याने आराम मिळेल.
4. मुतखडा, दृष्टी सुधारते - काेथिंबीर रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करते. काेथिंबिरीचे सेवन मूत्रपिंडासाठी देखील खूप फायदेशीर आहे. मूत्रपिंडातील दगड अर्थात मुतखड्याच्या समस्या असलेल्यांनी काेथिंबीर पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पाेटी प्या. हळूहळू मूत्रमार्गाने मुतखडा बाहेर निघून जाताे. हिरवी काेथिंबीर शरीरातील वाईट काेलेस्ट्राॅल कमी हाेऊन चांगले काेलेस्ट्राॅल वाढवते. दृष्टी कमकुवत असलेल्यांनी निश्चितपणे काेथिंबिरीचे सेवन करावे. हिरव्या काेथिंबीरमध्येही गाजराप्रमाणे व्हिटामिन ए भरपूर असल्याने त्याचा डाेळ्यांसाठी खूप फायदा हाेताे.