तोंडातील व्रण कसे रोखावेत ?

    29-Sep-2026
Total Views |

Aarogya 
कदाचित बऱ्याचजणांना हे माहीत नसेल की, काही लाेकांच्याच ताेंडात व्रण का पडतात? अध्ययनानुसार यासाठी स्ट्रेस, एक अ‍ॅमिनाे अ‍ॅसिडचे असंतुलन वा अनेक अ‍ॅसिडिक फूड्सचे डाएट जबाबदार असू शकते. येथे व्रणांच्या त्रासापासून आराम मिळवण्याचे जखमा लवकर भरण्याचे खास उपाय सांगत आहाेत.
 
मीठ-पाण्याच्या गुळण्या
एका माेठ्या ग्लासात काेमट पाणी घ्या. त्यात एक माेठा चमचा मीठ मिसळा.
या मिश्रणाने दिवसातून अनेकदा गुळण्या करा. पाणी ताेंडात भरून प्रथम ताेंडात खळखळवा व नंतर थुकून टाका. असे केल्यामुळे आपल्याला थाेडीशी जळजळ जाणवू शकते पण ही जखमा भरण्याची प्रक्रिया वेगवान करते.
 
मसालेदार व अँसिडिक पदार्थ टाळा
ताेंडात व्रण असतील तर मसालेदार पदार्थ टाळायला हवेत कारण यामुळे फक्त ब्रणांचेच नुकसान हाेत नाही तर समस्या अधिक उग्र हाेते.
 
आजमवा लायसिन टॅबलेट
छाेट्या प्रमाणात केलेल्या अध्यनातून कहतेकी जे लायसिन 500 मिलीग्रॅमच्या दाेन गाेळ्या सहा तासांच्या फरकाने घेतात त्यांच्या ताेंडातील व्रण 50 ट्नके लवकर बरे झाले.
 
आवश्क असल्यास डाॅक्टरांची मदत घ्या
जर व्रणांची स्थिती खूप खराब असेल तर त्वचाराेग तज्ज्ञाला दाखवा. आपले डाॅ्नटर कदाचित ‘टायमिकाेलाॅ अ‍ॅसेटाेनाइड’ नावाचे मलम लावण्याचा सल्ला देतील. यात स्टेराॅइड असते जे जखम लवकर भरण्यास मदत करते.