श्री दासबोध नित्यपाठ

आंतर्भाव ते सासुरवाडी। मायेबापें राहिली बापुडी ।।१।।

    29-Sep-2026
Total Views |

RamdasSwami 
पुढे हे बाळ दिसामासांनी वाढू लागले की मग त्याचे बाळपण संपून हळूहळू शहाणपण येऊ लागते आणि मग आईसंबंधीच्या आत्यंतिक प्रेमात वाटेकरी निर्माण हाेऊ लागतात. ताे मुले गाेळा करून खेळू लागताे आणि त्यात जिंकल्याचे हरल्याचे सुखदु:ख मानू लागताे.
 
अशा वेळी मग त्याला खेळात दंगल्यावर आईवडिलांची आठवणही राहात नाही. कधी तरी अवचित दात पडताे, हातपाय माेडताे आणि मग दु:खी हाेऊन बसताे. मुलांना बाळपणापासून तरुणपणापर्यंत वाढविणे साेपे नाही, असे सांगून श्रीसमर्थ म्हणतात की त्या मुलाला कधी खाेकला येताे, ताप येताे तर कधी देवी किंवा गाेवर असा गंभीर आजार हाेताे. अशावेळी अनेक लाेक अंगारे धुपारे, करणी असे अघाेरी उपाय सुचवतात, तर वैद्याचे औषध घ्या असे काेणी सांगताे. एकदंरीत गर्भावासाच्या दु:खातून मुक्त हाेऊन आनंदलेला जीव पुन्हा विविध त्रासांनी बेजार हाेताे आणि कधी कधी त्यात मरूनही जाताे. जर नशिबाने त्यातून वाचला तर आईवडील त्याला कधी गाेड बाेलून तर कधी मार देऊन शहाणा करतात आणि ताे हुशार हाेऊन आपल्या नावलाैकिकात भर घालेल, असा सर्वताेपरी प्रयत्न करीत राहतात.