चाणक्यनीती

    29-Sep-2026
Total Views |

Chankya 
वाच्यार्थ : लाकूड, पाषाण किंवा धातूला देव समजून श्रद्धाभाव ठेवून त्याची पूजा केल्यास ती सिद्धीस जाते आणि फलस्वरूप श्रीविष्णूकडून कृपाप्रसादही मिळताे.
 
भावार्थ ः मनात भाव असेल तर देवाची मूर्ती कशापासूनही बनविता येते.
 
1. लाकूड ः लाकडापासून काेरीव काम केल्यानंतर एखाद्या देवाची अर्थात महादेव, कृष्ण इ. तसेच देवीची म्हणजे पार्वती, दुर्गा इ. मूर्ती बनविता येतात; पण जाेपर्यंत एखादा भाविक श्रद्धेने त्या मूर्तीची पूजा करीत नाही; ताेपर्यंत ती फ्नत एक मूर्तीच असते. पूजेनंतर मात्र त्यात ‘देवत्व’ येते.
 
2. पाषाण ः शिल्पकार दगडातून सुंदर मूर्ती घडवितात; पण ती फ्नत एक शाेभेची वस्तू असते. श्रीरामाने सागरतीरी एक वाळूचे शिवलिंग बनविले; त्यात ‘शिवाची’ प्राणप्रतिष्ठा करून त्याची पूजा केली.