मुंबई, 28 सप्टेंबर (आ.प्र.) :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र आणि दिलखुलास कार्यक्रमात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची विशेष मुलाखत प्रसारित हाेणार आहे.
राज्यातील क्रीडा क्षेत्राचा विकास, खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा; तसेच शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध याेजनांची माहिती देओल यांनी या मुलाखतीत दिली आहे.
जय महाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवारी (29 सप्टेंबर) रात्री 8 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित हाेईल. तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत समाज माध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध हाेणार आहे. दिलखुलास कार्यक्रमात मंगळवार (29 सप्टेंबर), बुधवारी (30 सप्टेंबर) आणि गुरुवारी (1 ऑक्टाेबर) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर, तसेच न्यूज ऑन एआयआर अॅपवर ही मुलाखत प्रसारित हाेईल. या विशेष मुलाखतीचे निवेदन पूनम चांदाेरकर यांनी केले आहे. ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत खेळाडूंचा शाेध, अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा, दिव्यांग खेळाडूंसाठीच्या याेजनांची माहिती दिली.