संध्यानंद.काॅम
एकीकडे क्रयशक्ती असलेली आणि आवडीच्या वस्तू घालण्याचा आग्रही धरणारी जनरेशन झेड बाजारात प्रवेश करत आहे. बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, साेने काैटुंबिक स्तरावर परंपरेनुसार खरेदी केले जात असे, परंतु नवीन पिढी स्वत:च्या आवडीच्या साेन्याच्या वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरत आहे.
एक काळ हाेता जेव्हा साेने खरेदी करायला जाणाऱ्या महिला साेन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र किंवा साेन्याची चेन खरेदी करत असत; पण आता नवीन पिढी साेन्याच्या दुकानात जाते, तेव्हा त्यांना फक्त साेन्याच्या बांगड्याच नव्हे, तर नवीन काहीतरी हवे असते. भारतीय घरांमध्ये साेने हे फार पूर्वीपासून परंपरा आणि सुरक्षेचे प्रतीक मानले जाते; परंतु जनरेशन झेडसाठी ते आता केवळ एक काैटुंबिक वारसा किंवा लग्नातील खरेदीपेक्षा खूप अधिक बनत आहे. तरुण भारतीय साेन्याकडे एक आधुनिक आर्थिक मालमत्ता म्हणून पाहत आहेत.
वर्ल्ड गाेल्ड काैन्सिलच्या (थॠउ) ‘स्वर्णिम उडान 2047’ या नवीन अहवालानुसार, येत्या दशकांमध्ये भारताच्या सुवर्ण बाजाराला नव्याने आकार देण्यात जनरेशन झेड महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. अहवालानुसार बदलती जीवनशैली, वाढते उत्पन्न आणि वित्तीय क्षेत्रातील वाढती जागरूकता यामुळे नवीन पिढी ज्या प्रकारे साेने खरेदी करते, बाळगते आणि त्यात गुंतवणूक करते, त्यात बदल हाेण्याची शक्यता आहे.
जगातील सर्वात माेठा खासगी साेन्याचा साठा भारतात आहे. यातील बहुतेक साेने घरांमध्ये आणि लाॅकरमध्ये पडून आहे आणि त्याचा व्यापक अर्थव्यवस्थेत हातभार लागत नाही. असे म्हटले जाते की भारतीय घरांमध्ये 31,000 टन साेने पडून आहे.
त्याचे मूल्य 315 लाख काेटी असल्याचा अंदाज आहे. अनेकदा सुरक्षेचे कवच म्हणून साेन्याचा साठा केला जाताे. ते लग्नाच्या वेळी खरेदी केले जाते आणि नंतर आर्थिक अडचणीच्या काळात विकले जाते. अनेक कुटुंबांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवण्यासाठी आपली अशी छुपी संपत्ती विकली आहे.
वर्ल्ड गाेल्ड काैन्सिलच्या एका अहवालानुसार, जनरेशन झेड साेने बाळगण्याच्या आणि त्यात गुंतवणूक करण्याच्या आधुनिक पद्धतींचा स्वीकार करत आहे. त्यांच्या विचारसरणीतील हा बदल डिजिटल गाेल्ड, साेन्यावर आधारित आर्थिक उत्पादने आणि साेन्याचे मुद्रीकरण यासारख्या उत्पादनांमध्ये अधिक सहभागास प्राेत्साहन देऊ शकताे, ज्यामुळे घरातील न वापरलेले साेने अधिक उत्पादक मालमत्तेत रूपांतरित हाेऊ शकते.
अनेक तरुण ग्राहक परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्यास सहज तयार आहेत. लग्न आणि काेटुंबिक प्रसंगांसाठी साेन्याचे महत्त्व त्यांना अजूनही समजते; पण ते त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक नियाेजनाचा भाग म्हणून साेन्यात गुंतवणूकही करत आहेत. ‘स्वर्णिम उडान 2047’ अहवालातील एक प्रमुख निष्कर्ष म्हणजे भारतीय कुटंबांकडे असलेल्या साेन्याचे अफाट मूल्य. या अहवालानुसार, घरातील साेन्याचा माेठा भाग न वापरलेला राहताे आणि जर ताे औपचारिक वित्तीय प्रणालीमध्ये आणला गेला, तर त्याचे आर्थिक मूल्य सुमारे 315 लाख काेटी रुपये असू शकते.
‘डब्ल्यूजीसी’च्या मते, संरचित सुवर्ण उत्पादने आणि वित्तीय उपायांमध्ये अधिक सहभागाला प्राेत्साहन दिल्यास ही मालमत्ता अधिक उत्पादक बनण्यास मदत हाेऊ शकते, तसेच कुटुंबांना त्यांच्याकडील साेन्याचा लाभ घेणे सुरू ठेवता येईल. यामुळे साेन्याची मागणी मजबूत राहण्याची अपेक्षा आहे. अहवालात नमूद केले आहे की, येत्या काही वर्षांत भारतातील साेन्याची मागणी संरचनात्मकदृष्ट्या उच्च राहण्याची अपेक्षा आहे. तथापि, ही मागणी पूर्ण करण्यासाठी देश माेठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. यावर उपाय म्हणून ‘डब्ल्यूजीसी’ने देशांतर्गत सुवर्ण खाणकामास प्राेत्साहन देण्यासाेबतच पुनर्चक्रीकरण आणि सुवर्ण मुद्रीकरणाच्या गरजेवर भर दिला आहे.