मुंबई, 28 सप्टेंबर (आ.प्र.) :
भारतीय जीवनशैली आणि आयुर्वेद शास्त्र ही निराेगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. आजार झाल्यानंतर उपचार करण्याबराेबरच आजार हाेऊ नये यासाठी आयुर्वेद, संतुलित आहार आणि याेगाचा अंगीकार करणे आवश्यक आहे.
आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली आणि जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली उपचारपद्धती असून, शहरी तसेच ग्रामीण भागात आयुष चिकित्सा अधिक सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे आराेग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय आयुष अभियानाच्या वतीने आयुर्वेद दिन व सेवा संकल्प अभियानाच्या अंतर्गत आराेग्य सेवा आयु्नतालयात झालेल्या कार्यक्रमात आबिटकर बाेलत हाेते. यावेळी आराेग्य राज्यमंत्री मेघना साकाेरे-बाेर्डीकर उपस्थित हाेत्या.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक खाद्य पाककृती तसेच भविष्यासाठी आयुर्वेद आणि वार्धक्य काळात आयुर्वे दाची साथ या हस्तपुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.
राज्यात राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत 261 आराेग्य संस्थांमध्ये आयुष सेवा दिली जात आहे. तसेच 390 ठिकाणी आयुष्मान आराेग्य मंदिरांच्या माध्यमातून आयुष चिकित्सा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयुष ग्राम, आयुष्मान आराेग्य मंदिर आणि याेग दिनाच्या माध्यमातून आयुष चिकित्सा व निराेगी जीवनशैलीचा प्रसार करण्यात येत असून, आगामी काळात आयुष संस्थांचे अधिक बळकटीकरण करण्यात येणार असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.