घरी बसूनच तुम्ही हृदयाचे आरोग्य व कमजोरीची माहिती मिळवू शकता

    28-Sep-2026
Total Views |
चुकीची लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, शरीराची हालचाल न करणे अशा अनेक कारणांमुळे हृदयराेगांचा
 
 
 
 
HeartHealth
धाेका वाढताे. हृदय राेगांमुळे जीव जाणाऱ्यांची संख्या जगभरात जास्त आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे हृदयराेग हाेतात आणि हृदय काम करणं बंद करतं. अशात हाॅस्पिटलमध्ये गेल्यावर ईसीजी आणि इकाेसारख्या टेस्ट करून हृदयाच्या क्रिया कशा हाेत आहेत याची माहिती मिळते.सामान्यपणे हृदयाचं आराेग्य कसं आहे हे जाणून घेण्यासाठी डाॅक्टर या टेस्टची मदत घेतात. मात्र, काही गाेष्टींच्या मदतीने तुम्ही घरीच हृदयाचं आराेग्य कसं आहे याची माहिती मिळवू शकता. यासाठी ना तुम्हाला मशीन लागते ना पैसे. डल्ट न्ड पीडियाट्रिक न्यूराेलाॅजिस्ट डाॅक्टर चंद्रिल चुग यांनी सांगितलं की, कशाप्रकारे घरी बसूनच तुम्ही हृदयाच्या कमजाेरीची माहिती मिळवू शकता.
 
 कंबरेची साईज माेजा :
जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असाेसिएशनवर प्रकाशित एका रिपाेर्टनुसार, हार्ट अटॅकचा धाेका जाणून घेण्यासाठी कंबरेची साईज माेजणे हा एक उपाय आहे. एका अंदाजानुसार, काेणत्याही पुरूषाच्या कंबरेची साईज 37 इंचापेक्षा जास्त असेल तर त्यांचं हृदय कमजाेर असू शकतं. तेच महिलांमध्ये हे याची सीमा 31.5 इंच असते. पुरूषांमध्ये 40 इंच व महिलांमध्ये 35 इंच हृदयासाठी गंभीर ठरू शकते. कारण लठ्ठपणामुळे हृदयावर अधिक दबाव पडताे. लठ्ठपणा असल्यावर शरीरात बॅड काेलेस्ट्राॅल वाढणं काॅमन आहे व याने फॅट नसांमध्ये ब्लाॅकेज करण्याचं कारण ठरतं.
 
हार्ट ब्लाॅकेज जाणून घेण्याची घरगुती टेस्ट :
नसांच्या माध्यमातून तुम्ही पल्स रेट किंवा हार्ट रेट जाणून घेऊ शकता. पल्स रेट माेजून हे जाणून घेता येतं की, नसांमध्ये ब्लाॅकेज आहे की नाही. ब्रिटिश हार्ट फाउंडेशन नुसार, एक सामान्य हालचाल आणि वयाच्या व्यक्तीची नस आरामाच्या स्थितीमध्ये एक मिनिटामध्ये 60 ते 100 बीट्स दरम्यान असली पाहिजे. हार्ट रेट कमी असल्यावर श्वास भरून येणे, चक्कर येणे अशी लक्षणं दिसली तर डाॅक्टरांना दाखवलं पाहिजे.
 
40 पायऱ्या चढा :
ही टेस्ट एक्सरसाईज टाॅलरेन्स दाखवते. जर तुम्ही 40 पायऱ्या दम न लागता किंवा न थकता चढू शकत असाल तर तुमचं हृदय चांगलं आहे. कमजाेरी किंवा ब्लाॅकेज असल्यावर हृदयावर दबाव पडताे. अशात हृदय वेगाने धडधडतं आणि दमही लागताे.
 
हृदय निराेगी ठेवण्यासाठी काय कराल?
काय खाणं टाळावं? :
अनेकांना जेवणात वरून मीठ घेण्याची सवय असते. ही सवय त्यांच्यासाठी फार जास्त घातक आहे. तसेच वेगवेगळ्या फास्ट फूडमध्येही मिठाचं प्रमाण अधिक असतं. जास्त मिठामुळे हृदयाचं नुकसान हाेतं. त्यामुळे मीठ आणि साखरेचं सेवन कमीत कमी करा. तसेच जास्त कार्बाेहायड्रेट्स असलेले पदार्थ कमी खावीत. फास्ट फूड आणि जंक फूड फार कमी खावेत. कारण मार्केट मधील हे पदार्थ फारच स्वस्त आणि खराब क्वालिटीच्या तेलात बनवलेले असतात. याचा थेट प्रभाव हृदयावर पडताे. एकदा वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरलं जातं.
 
पाकिटातील पदार्थ टाळा :
प्राेसेस्ड आणि प्रिजर्व्ड म्हणजे डब्यात बंद असलेले पदार्थ खाल्ल्याने आराेग्य खासकरून हृदयाला जास्त नुकसान हाेतं. रेडी टू इट म्हणजे सेमी कुक्ड पदार्थ जसे की, भाज्या, बिर्याणी, पराठे, मिठाई इत्यादी तसेच पॅकेट मधील ज्यूस, साॅफ्ट ड्रिंक्स सुद्धा हृदयासाठी नुकसानकारक ठरतं.
 
एक्सरसाईज गरजेची :
कितीही कंटाळा आला तरी राेज कमीत कमी अर्धा तास तुम्ही काेणतीही एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. पायी चालावं किंवा रनिंग करावी यानेही बराच फायदा मिळताे. एक्सरसाइजने शरीरातील नसा माेकळ्या हाेतात, फॅट बर्न हाेतं, रक्तप्रवाह सुरळीत हाेताे. ज्यामुळे हृदय निराेगी राहतं.