श्रीमंत दगडूशेठच्या बाप्पाचे ३ कोटीवर गणेशभक्तांनी घेतले ऑनलाइन दर्शन

    28-Sep-2026
Total Views |

OnlineDagdushethDarshan 
पुणे, 27 सप्टेंबर (आ.प्र.) :
भारतासह नेपाळ, अमेरिका, थायलंड, संयु्नत अरब अमिरातीबराेबरच जगभरातील 3 काेटींपेक्षा अधिक गणेशभ्नतांनी गणेशाेत्सवाच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या फेसबुक, इन्स्ट्राग्राम, यूट्यूब, वेबसाइटसह इतर समाज माध्यमांवर गणपतीचे दर्शन घेतले. अनेकांना गणरायाच्या दर्शनासाठी पुण्यात प्रत्यक्ष येता येणे शक्य नसते. त्यामुळे ऑनलाइन माध्यमातून उत्सवाचा आनंद जगभरातील भाविकांना देण्याचा प्रयत्न ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे.
 
पुण्यासह मुंबई, ठाणे, नागपूर, दिल्ली, काेलकाता, नाशिक, अहमदाबाद व सुरत या शहरांतून गणेशभ्नतांनी ट्रस्टच्या सर्व माध्यमांतून बाप्पाचे दर्शन घेतले.
 
 
कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, इंडाेनेशिया आणि पाकिस्तानमधूनही ट्रस्टच्या समाज माध्यमांवरून गणेशभ्नतांनी बाप्पाचे दर्शन घेतले. सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम सुरू झाले. तेव्हापासून ट्रस्टच्या ऑनलाइन सेवांतून लाखाे भाविक दर्शन घेत हाेते.