बीजिंग, 27 सप्टेंबर (वि.प्र.) :
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि राेबाेटिक्स क्षेत्रात वेगाने प्रगती करणाऱ्या चीनने आता आणखी एक माेठी झेप घेतली आहे. चीनमधील युबाेटेक (णइढएउक) कंपनीने ह्युमनाॅइड राेबाेट्सच्या मदतीने नव्या ह्युमनाॅइड राेबाेट्सचे उत्पादन करणारी अत्याधुनिक फॅक्टरी सुरू केली आहे. या कारखान्यात एकाच क्लिकवर सहा राेबाेट्सच्या उत्पादनाची प्रक्रिया सुरू करता येते.
चीनच्या गुआंग्शी प्रांतातील लिउझाेऊ येथे सुमारे 14 हजार चाैरस मीटर क्षेत्रात ही फॅक्टरी उभारण्यात आली आहे. विशेष एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने येथे ह्युमनाॅइड राेबाेट्सचे उत्पादन केले जात आहे. विशेष म्हणजे, नव्या राेबाेट्सच्या निर्मितीतही ह्युमनाॅइड राेबाेट्सचीच मदत घेतली जात आहे.
वर्षाला 10 हजार ह्युमनाॅइड राेबाेट्स बनविण्याची क्षमता या फॅक्टरीमध्ये एक राेबाेट तयार करण्यासाठी अवघी 10 मिनिटे लागतात. म्हणजेच एका क्लिकवर सहा राेबाेट्सची निर्मिती सुरू हाेऊ शकते. फॅक्टरीची वार्षिक उत्पादन क्षमता 10 हजार राेबाेट्स इतकी असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
युबाेटेक आणि सिमेन्स डिजिटल इंडस्ट्री साॅफ्टवेअरने संयुक्तपणे या राेबाेट्सच्या डिझाइन आणि उत्पादनाची व्यवस्था विकसित केली आहे. कंपनीने या प्रणालीला ‘स्मार्ट ब्रेन’ असे नाव दिले आहे. या स्मार्ट ब्रेनच्या माध्यमातून संपूर्ण उत्पादन लाइनचे नियंत्रण आणि समन्वय साधला जाताे.
राेबाेट्सच करतात राेबाेट्सचे असेंब्लीचे काम फॅक्टरीमध्ये ह्युमनाॅइड राेबाेट्सच्या वेगवेगळ्या भागांची निर्मिती आणि असेंब्ली केली जाते. प्रत्येक राेबाेट तयार झाल्यानंतर त्याला स्वतंत्र सीरियल नंबर दिला जाताे.
त्यानंतर विविध चाचण्यांद्वारे त्याची गुणवत्ता तपासली जाते. राेबाेट्सची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी सुमारे चार तासांची हेल्थ टेस्टिंग केली जाते. या चाचणीदरम्यान राेबाेटच्या हालचाली, कार्यक्षमता आणि व्हिज्युअल इन्स्पेक्शन केले जाते. सर्व चाचण्यांमध्ये राेबाेट याेग्य प्रकारे काम करत असल्याचे सिद्ध झाल्यानंतरच त्याला पुढील प्रक्रियेसाठी पाठविले जाते.
औद्याेगिक राेबाेट्सच्या निर्मितीचे नवे केंद्र या फॅक्टरीतील उत्पादन प्रक्रियेत राेबाेट्सच माेठ्या प्रमाणावर काम करत असल्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एआय आणि ऑटाेमेशनच्या साहाय्याने उत्पादनाचा वेग वाढवतानाच गुणवत्तेवरही काटेकाेर नियंत्रण ठेवले जात आहे. चीनमध्ये यापूर्वीही राेबाेटिक्सच्या क्षेत्रात माेठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू आहे. मात्र, ह्युमनाॅइड राेबाेट्सच्या मदतीनेच नव्या ह्युमनाॅइड आणि औद्याेगिक राेबाेट्सची निर्मिती करणारी ही फॅक्टरी राेबाेटिक्स उद्याेगासाठी नवी दिशा ठरू शकते.