श्री दासबोध नित्यपाठ

गर्भी म्हणे सोहं सोहं। बाहेरी पडतां म्हणे कोहं ।।२।।

    24-Sep-2026
Total Views |

RamdasSwami 
जन्मापूर्वी काेंडून दडपला गेलेला आणि माेठ्या कष्टाने मातेच्या उदरातून बाह्य जगात अवतीर्ण झालेला जीव जन्म हाेताच गर्भावस्थेचे दु:ख आणि जन्माच्या यातना स्वत:च विसरून जाताे.
 
त्याचे मन शून्याकार म्हणजे अज्ञानी बनते. मागील सर्व गाेष्टी ताे विसरून जाताे आणि शरीर म्हणजेच मी या अज्ञानाचा आणि अविद्येचा त्याच्या बुद्धीवर पडदा येताे. त्या भ्रांतीमुळे त्याला दु:ख हाेण्याऐवजी त्या विस्मरणाने उलट ऐहिक आनंदच वाटू लागताे.पुढे हे बाळ जसजसे माेठे हाेऊ लागते तसतसे षडरिपुंच्या आणि विकारांच्या जाळ्यात अलगद गुंडाळले जाते.
 
देहाचे सुख आणि दु:ख या दाेन्हींच्या हेलकाव्यात आणि आशा निराशेच्या खेळात ते गुंतून जाते आणि मायारूपी प्रपंचात जास्त जास्त अडकत जाते. जन्मापूर्वीची आणि जन्माची अवस्था यांचे हे वर्णन करून श्रीसमर्थ म्हणतात की, या यातना चुकवावयाच्या असतील तर भगवंताला शरण जावे. त्याच्या कृपेने सत्याचे ज्ञान हाेऊ शकेल आणि जीव आत्मज्ञान पावून जन्ममरणाचे येरझाऱ्यातून मुक्त हाेऊ शकेल. जन्माच्या आणि देहाच्या इत्नया दु:स्थितीचे वर्णन करण्यामागे देहाचे अतिममत्व आणि ‘मी देही’ ही भावना कमी व्हावी हाच श्रीसमर्थांचा हेतू आहे. प्रत्यक्षात मानवी जन्म, त्यापासून प्राप्त हाेणारा मानवी देह यातून परमेश्वरप्राप्तीचा मार्ग सापडू शकताे.
 
मनुष्य याेनीशिवाय अन्य काेणत्याही जन्मात ते श्नय हाेत नाही, हे सत्य त्यांनी स्वत:च पुढे ‘नरदेह स्तवन’ या समासात सविस्तरपणे सांगितले आहे. या वर्णनानंतर प्रपंची माणसाचे आयुष्य कसे माया, माेह आणि शरीर यांच्यात गुंतत जाणारे असते त्याचे वर्णन त्यांनी पुढील चार समासात एका माणसाची जीवनकथा सविस्तरपणे रंगवून सांगून स्पष्ट केले आहे. याच्या पाठीमागे असणारी श्रीसमर्थांची देहाविषयीचे अतिममत्व टाळावे ही शिकवण आपण लक्षात घेणे व मनात ठसविणे अतिशय गरजेचे आहे.
 
- प्रा. अरुण गाेडबाेले,
माे. 9822016299