पनवेल-कर्जत लोकल सेवा लवकरच होणार सुरू

प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण : आता प्रतीक्षा सीआरएसच्या मंजुरीची

    24-Sep-2026
Total Views |

Railway 
कर्जत, 23 सप्टेंबर (आ.प्र.) :
पनवेल-कर्जत मार्गावरून लवकरच लाेकल सेवा सुरू हाेण्याची चिन्हे आहेत. या मार्गाचे दुपदरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे पाेहाेचले आहे. दिवाळीत या सेवांचे लाेकार्पण करण्याच्या दृष्टीने रेल्वेने तयारी सुरू केली आहे. सीआरएसच्या मंजुरीनंतर प्रवासी सेवा सुरू करणे शक्य हाेणार आहे.
 
कर्जत आणि पनवेलदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक सुलभ आणि थेट करण्यासाठी सुरू असलेल्या पनवेलकर्जत उपनगरी रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे.
 
29.6 किमीच्या या दुहेरी मार्गिकेचे सुमारे 99 ट्नके काम पूर्ण झाले असून, दिवाळीच्या मुहूर्तावर लाेकल सेवा सुरू करण्यासाठी रेल्वेची तयारी सुरू आहे. मात्र, प्रवासी सेवा सुरू करण्यापूर्वी रेल्वे सुरक्षा आयु्नतांकडून (सीआरएस) मार्गिकेची तपासणी आणि मंजुरी घेणे आवश्यक आहे.
 
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-3 (एमयूटीपी-3) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हीसी) 2782 काेटींचा हा प्रकल्प उभारला जात आहे. या मार्गामुळे पनवेल-कर्जतदरम्यान पर्यायी उपनगरी मार्ग उपलब्ध हाेणार असून, नवी मुंबईसह कर्जत आणि रायगड परिसरातील जाेडणी अधिक सक्षम हाेईल. या मार्गावर पनवेल, चिखले, पाेयंजे, चाैक आणि कर्जत अशी पाच स्थानके आहेत. माेहापे स्थानकाचे नाव बदलून पाेयंजे करण्यात आले आहे.
 
नवीन पनवेल स्थानकाची इमारत सुरू झाली असून, चिखले आणि पाेयंजे स्थानकांच्या इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. चाैक आणि कर्जत स्थानकांवर फलाट, प्रवासी परिसर, छत, लिफ्ट, जिने आणि इतर सुविधांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. सिग्नल यंत्रणेत पाेयंजे आणि चाैक येथे इलेक्ट्राॅनिक इंटरलाॅकिंगसाठी कारखाना स्वीकृती चाचणी पूर्ण झाली आहे. दूरसंचार आणि इतर यंत्रणांची कामे सुरू आहेत. खासगी, सरकारी आणि वनजमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे.
 
पनवेल-कर्जत दुपदरीकरण प्रकल्पातील बहुतांश बांधकामे पूर्ण झाली आहेत. सर्व प्रमुख आणि लहान पूल, पाच रस्ते उड्डाणपूल आणि 16 रस्ते भुयारी मार्ग पूर्ण झाले आहेत. मार्गिकेवरील तीनही बाेगद्यांचे खाेदकाम पूर्ण झाले आहे. पनवेल आणि कर्जतच्या दिशेने असलेले दाेन्ही रेल्वे उड्डाणपूल पूर्ण झाले असून, त्यावर रुळजाेडणीचे काम सुरू आहे. पुणे-द्रुतगती महामार्गाखालील भुयारी मार्गातून रुळजाेडणीचे कामही पूर्ण झाले आहे.