2. भाऊबंदकीत गेलेले धन ः नाेकरीनंतर, निवृत्तीनंतर पैशांची खरी गरज असते. अशावेळी जवळच्या लाेकांनी फसवून व्य्नतीचे धन लुबाडले असेल तर त्याला अत्यंत दुःख हाेते आणि दुर्दशादेखील हाेते ! पुष्कळ वेळेला पाेटची मुलेही ‘सह्या’ घेऊन घर-दार, शेती हडप करतात आणि जन्मदात्या वडिलांना मात्र एकटे साेडतात.
3. जेवण्यासाठी पराधीन ः म्हातारपणी तर रिकामपणामुळे किंवा ‘साखरेची बिमारी’ (डायबीटीस) झाल्यास भूक जास्तच लागते. अशावेळी जेव्हा मिळेल, जे मिळेल ते चुपचाप खाणे किंवा घरच्याच लाेकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर माणसाला मेल्याहून मेल्यासारखे हाेते.
बाेध ः भरपूर आयुर्मान असणे हे सगळ्यांसाठीच आनंददायी असते, असे नाही. नुसत्याच लांबलचक अर्थशून्य, रटाळ आयुष्यापेक्षा ‘अखेरचा दिस गाेड’ करणार लक्षणीय आयुष्य ज्याला मिळते ताे खरा भाग्यवान ठरताे; पण आपण सर्वांनी वृद्धांच्या समस्या जाणून त्यांच्याशी सहानुभूतीने वागल्यास हा प्रश्न सुटू शकताे.