अमरावती, 23 सप्टेंबर (आ.प्र.) :
अमरावती ग्रामीण पाेलिसांतर्फे व्यसनमु्नतीसाठी राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन कवच अंतर्गत ‘नाॅट नाॅर्मल’ या व्यसनविराेधी लघुपटाच्या ट्रेलरचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. आमदार सर्वश्री प्रताप अडसड, उमेश यावलकर, प्रवीण तायडे, रवी राणा, केवलराम काळे यांच्यासह विभागीय आयु्नत नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पाेलीस अधीक्षक निकेतन कदम आदी यावेळी उपस्थित हाेते. पाेलीस अधीक्षकांच्या पुढाकाराने स्थानिक कलाकारांना घेऊन ‘नाॅट नाॅर्मल’ या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तरुणाईला ड्रग्ज आणि विविध व्यसनांच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी तसेच नशेचा नकार जीवनाचा स्वीकार! हा संदेश घराघरांत पाेहाेचवण्यासाठी या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
हा लघुपट समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेवर प्रकाश टाकणारा असून, नशामु्नत महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रभावी ठरेल, असा विश्वास यावेळी व्य्नत करण्यात आला. या लघुपटाचा पूर्ण ट्रेलर आता यूट्यूबवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.