कॉमन मोबिलिटी कार्ड नोंदणी आता आधार ओटीपीद्वारेही केली जाणार

    24-Sep-2026
Total Views |
 
ST
मुंबई, 23 सप्टेंबर (आ.प्र.) :
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नॅशनल काॅमन माेबिलिटी कार्ड (एनसीएमसी) नाेंदणीतील अडचणींवर आता आधार ओटीपीचा पर्याय उपलब्ध हाेणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचे बाेटांचे ठसे जुळत नसल्यास आधारशी जाेडलेल्या माेबाइल क्रमांकावर येणाऱ्या ओटीपीद्वारे नाेंदणी करता येईल. ही सुविधा 21 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.
 
बायाेमेट्रिक प्रमाणीकरणात अडचण येणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिकांना आधार ओटीपीद्वारे नाेंदणी करता येणार आहे. हरवलेले, चाेरीला गेलेले कार्ड बंद करून नवीन कार्ड घेता येईल. त्यासाठी 199 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. नाेंदणी करणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांना क्यूआर काेड असलेली पावती दिली जात आहे. एसटीच्या तिकीट यंत्रावर पावती स्कॅन केल्यानंतर सवलतीचे तिकीट मिळणार आहे, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.