गुडघ्यांच दुखणे असेल तर व्यक्ती नैराश्यात (डिप्रेशन) ढकलली जाण्याची पूर्ण शक्यता असते, त्यामुळे गुडघ्यांच्या दुखण्याला हलक्यात घ्यायला नकाे! नैराश्य ही आज एक सामान्य समस्या बनली आहे. काम-धंद्याचे आव्हाने, वैयक्तिक अडचणी आणि शारीरिक समस्या नैराश्याचे कारण बनू शकतात. (भाग 2)
हर्बल मलम (लेप) :
डिंक, दालचिनीची पाने, तिळाचे तेल आणि सुंठ यांसारखी देशी औषधे घेऊन त्याचे क्रीम (लेप) तयार करा. तुमच्या दुखऱ्या गुडघ्यावर हा लेप नियमित लावाल तर थाेड्याच वेळात तुम्हाला खूप आराम वाटेल. आयुर्वेदात शतकांपासून असे हर्बल उपचार हाेत आले आहेत आणि आजही ते आपल्या शरीरासाठी प्रभावी आणि फायदेशीर ठरतात.
थंड आणि गरम शेक :
दशकांपासून गुडघेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी थंड आणि गरम शेकचा उपाय वापरला जाताे. गरम शेक केल्याने हाडांचे सांधे कडक हाेण्यापासून राेखता येतात, तर थंड शेक काेणत्याही बाह्य दुखापतीमुळे हाेणाऱ्या वेदनांमध्ये आराम देताे. यामुळे गुडघ्याची सूज आणि वेदना कमी हाेण्यास मदत हाेते.
व्यायाम :
जर काेणाचे गुडघेदुखीचे प्रमाण तीव्र नसेल, तर ती व्यक्ती पायाच्या सांध्यांचा नियमित व्यायाम करून गुडघ्याच्या वेदनांमधून तात्पुरती मुक्ती मिळवू शकते. कारण व्यायाम टाळून संधिवाताचा रुग्ण शारीरिक हालचाली न करता आपले दाेन्ही पाय स्थिर ठेवेल, तर त्याचे दुखणे अधिक विकाेपाला जाऊ शकते.
वजन नियंत्रणात ठेवा :
शेवटची पण सर्वात महत्त्वाची गाेष्ट म्हणजे शरीराचे अतिरिक्त वजन गुडघ्यांच्या सांध्यांवर अतिरिक्त दाब आणते आणि त्यामुळे संधिवाताने पीडित लाेकांना खूप तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. वैज्ञानिक संशाेधनांवरून असे दिसून आले आहे की थाेडेसे वजन कमी केल्यानेही गुडघेदुखी खूप कमी हाेते आणि सांधे उत्तम प्रकारे कार्य करू शकतात; म्हणूनच डाॅक्टर निराेगी वजन राखण्याचा सल्ला देतात. वजन नियंत्रणात ठेवल्याने केवळ शारीरिक आराेग्यच लाभत नाही, तर मानसिक आराेग्यही सुधारते. त्यामुळे गुडघ्यांच्या हट्टी दुखण्यामुळे येणारे नैराश्य टाळता येऊ शकते.