ओपन एआयमधील दोष दाखवल्याने तीन भारतीयांना बक्षीस

    24-Sep-2026
Total Views |

AI 
मुंबई, 23 सप्टेंबर (आ.प्र.) :
तीन भारतीय वंशाच्या सुरक्षा संशाेधकांनी अ‍ॅन्थ्राेपिकच्या क्लाॅड एआयचा वापर करून ओपन एआयची यंत्रणा हॅक केली. हर्ष जयस्वाल, माेहन पेधापती आणि राहुल मैनी या भारतीय संशाेधकांनी अवघ्या 72 तासांपेक्षा कमी वेळात आणि 3,000 डाॅलर्सपेक्षा कमी खर्चात हा प्रयाेग यशस्वी केला.
 
यात क्लाॅड एआयने काेड लिहिणे आणि त्रुटी शाेधण्यात मदत केली. ओपन एआयने ही त्रुटी सुधारून या टीमला 6,500 डाॅलर राेख बक्षीस जाहीर केले आहे.
 
ओपन एआयच्या सिस्टिममधील ही माेठी त्रुटी शाेधून काढणाऱ्या संशाेधकांमध्ये हर्ष जयस्वाल, माेहन पेधापती आणि राहुल मैनी या तीन भारतीय वंशाच्या तरुणांचा समावेश आहे. हे तिघेही ‘एथिकल हॅकर्स’ आणि सायबर सुरक्षा संशाेधक म्हणून काम करतात. कंपन्यांच्या सिस्टिममधील धाेके आणि त्रुटी शाेधून त्या सुधारण्यास मदत करणे हे त्यांचे काम असते. या हॅकिंग प्रयाेगाचे सर्वात माेठे वैशिष्ट्य म्हणजे यात एका एआय टूल्सचा वापर दुसऱ्या माेठ्या एआय कंपनीच्या त्रुटी शाेधण्यासाठी करण्यात आला.
हर्ष, माेहन आणि राहुल यांनी क्लाॅडचा वापर एक साहाय्यक म्हणून केला. क्लाेद एआयने त्यांना मुख्य हॅकिंग काेड लिहिणे, काेडमधील चुका दुरुस्त करणे आणि सुरक्षा प्रणालीनुसार काेडमध्ये बदल करणे यासाठी वेगाने मदत केली. या तिघांनी सिस्टिममधील वेगवेगळ्या छाेट्या त्रुटी एकमेकांशी जाेडल्या आणि क्लाॅडच्या मदतीने मुख्य ‘एक्सप्लाॅइट’ तयार करून ओपन एआयवर यशस्वी हल्ला चढवला.
 
हा संपूर्ण प्रयाेग करण्यासाठी या टीमला 72 तासांपेक्षा कमी वेळ लागला. विशेष म्हणजे, यासाठी त्यांना अवघा 3,000 डाॅलर्सपेक्षा कमी खर्च आला. याद्वारे त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे अंतर्गत अकाउंट्स आणि त्यांचे खासगी ‘गिटहब रेपाॅजिटरी’ म्हणजेच जिथे कंपनीचे महत्त्वाचे काेड्स आणि डेटा सुरक्षित ठेवला जाताे, त्यावर नियंत्रण मिळवले हाेते. हा प्रयाेग काेणत्याही गैरहेतूने करण्यात आला नव्हता. संशाेधकांनी या त्रुटी शाेधल्या.
 
तातडीने याची माहिती ओपन एआयच्या सुरक्षा टीमला दिली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलली आणि आपली सिस्टिम सुरक्षित केली. या माेठ्या त्रुटीचा शाेध लावून कंपनीला संभाव्य माेठ्या नुकसानीपासून वाचवल्याबद्दल भारतीय टीमचे आभार मानले. तसेच, त्यांच्या ‘बग-बाउंटी’ प्राेग्राम अंतर्गत या तिघांना 6,500 डाॅलर्सचे (सुमारे 5.4 लाख रुपये) राेख बक्षीस देऊन सन्मानित केले. AI