कृष्णेसह सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांत उपसाबंदी : सीमा मोहिते

    23-Sep-2026
Total Views |
 
DamWater
सांगली, 22 सप्टेंबर (आ.प्र.) :
सांगली जिल्ह्यातील शेती, औद्याेगिक वापरासाठीच्या पाणी याेजनांवर उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. कृष्णा नदीसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांत ही उपसाबंदी लागू राहील. पिण्याच्या पाणी याेजना मात्र सुरूच राहतील, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा माेहिते यांनी दिली.
 
डिग्रज बंधाऱ्यापासून राजापूर धरणापर्यंत उपसाबंदी लागू असेल. जत तालुक्यातील सर्व 26 तलाव, कवठेमहांकाळ, मिरज, वाळवा व शिराळा तालुक्यातील सांगली पाटबंधारे विभागांतर्गत 17 तलाव, माेरणा नदी व त्यावरील बंधारे, कवठेमहांकाळ तालुक्यातील बसाप्पावाडी मध्यम प्रकल्प, बंडगरवाडी, बाेरगाव, दुधेभावी, घाेरपडी, हराेली, कुची, लांडगेवाडी, लंगरपेठ, नांगाेळे, रायवाडी हे 10 लघुप्रकल्प, मिरज तालुक्यातील भाेसे मिरज लघुप्रकल्प, शिराळा तालुक्यातील माेरणा मध्यम प्रकल्प; तसेच अंत्री, शिवणी, टाकवे व वाकुर्डे हे लघुप्रकल्प, वाळवा तालुक्यातील कार्वे व रेठरे धरण या लघुप्रकल्पांतून उपसा करता येणार नाही. दरम्यान, सांगलीसाठी काेयना धरणातून पाणी साेडण्यात येत आहे.
 
दाेन वक्र दरवाजे 1 फुटाने उघडून 2933 क्युसेक विसर्ग काेयना नदीपात्रात साेडण्यात येत आहे. धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून, त्याद्वारे 1050 क्युसेक विसर्ग सुरू आहे.