चाणक्यनीती

    23-Sep-2026
Total Views |

Chankya 
वाच्यार्थ : वृद्धावस्थेत (म्हातारपणी) पत्नी मरणे, बांधवांनी धन लुबाडणे, जेवणासाठी परावलंबित्व येणे या तीन गाेष्टी पुरुषासाठी अत्यंत लाजिरवाण्या आहेत.
 
भावार्थ ः वार्ध्नयात खालील गाेष्टी अत्यंत त्रासदायक आहेत.
 
1. पत्नीचा मृत्यू ः पत्नी ही जीवनसाथी असते. विवाहानंतर बऱ्या-वाईट प्रसंगात तिचीच खरी साथ-साेबत पतीला लाभते. सुख-दुःख वाटण्यासाठी तिच्याएवढे जवळचे कुणी नसते. लग्नानंतर बाेला-चाली झाल्यातरी या अवस्थेपर्यंत दाेघांनी एकमेकांना (पती-पत्नी म्हणून जसे आहेत तसे गुणदाेषांसह) स्वीकारलेले असते. ते एकमेकांना पूर्णपणे समजून घेतात. तरुण, प्राैढ वयात पुरुष कर्तबगारी दाखविण्यात मग्न असताे. उतार वयात, निवृत्तीच्या आयुष्यातच त्याला खरी साेबत हवी असते. जी फ्नत पत्नीच देऊ शकते; परंतु तीच मृत्यू पावली तर पतीवर जणू आभाळच काेसळते.