स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी आता राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना

    23-Sep-2026
Total Views |
 
WomenSafety
मुंबई, 22 सप्टेंबर (आ.प्र.) :
स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदा गर्भपात राेखण्यासाठी विधान परिषदेच्या माजी उपसभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. सार्वजनिक आराेग्य विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला. गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्रे अधिनियम; तसेच वैद्यकीय गर्भपात अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या दलावर साेपवण्यात आली आहे.
 
कृती दलाकडून विविध जिल्हे आणि महापालिका क्षेत्रांना भेटी देऊन कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. साेनाेग्राफी, निदान आणि वैद्यकीय गर्भपात केंद्रांची संबंधित अधिकाऱ्यांसह अचानक तपासणी केली जाणार आहे. डाॅ. सातव, भावना गवळी, चित्रा वाघ, उमा खापरे, डाॅ. कायंदे, स्नेहा दुबे पंडित आणि श्वेता महाले यांचा या दलात सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.