पुणे, 22 सप्टेंबर (आ.प्र.) :
गर्दीत श्वास घेण्यासाठी झालेला त्रास, च्नकर येणे, र्नतदाबाच्या समस्या; तसेच उत्सव काळात आलेल्या आपत्कालीन आराेग्यविषयक समस्यांचे निराकरण करत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे 6 हजार भाविकांना आराेग्यसेवा देण्यात आली. माेफत आयसीयूसह 3 ठिकाणी केंद्र, माेफत रुग्णवाहिका सेवाही मंदिर परिसर आणि उत्सवाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या 134व्या वर्षी गणेशाेत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी राेज लाखाे भाविक येत आहेत.
त्यांच्या आराेग्याच्या समस्यांचे निराकरण जय गणेश आराेग्यसेवा अभियानांतर्गत जय गणेश प्रांगणासह मंदिर परिसरात तीन ठिकाणी केले जात आहे.
उत्सव काळात 55 वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक 24 तास कार्यरत आहे. आजपर्यंत प्राथमिक आराेग्य सेवा केंद्रात 5900 पेक्षा अधिक भाविक आणि आयसीयूमध्ये 91 पेक्षा अधिक भाविकांवर उपचार करण्यात आले. उपक्रमाचे नियाेजन ट्रस्टचे सर्व विश्वस्त, सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले असून, ट्रस्टचे वैद्यकीय विभाग प्रमुख राजेंद्र परदेशी सर्व व्यवस्थापन पाहत आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.
सिटी पाेस्ट, दगडूशेठ गणपती मंदिर व मांगल्य मंगल कार्यालयजवळ सुसज्ज अशी 24 तास माेफत वैद्यकीय मदत केंद्रे आहेत. याशिवाय भारती हाॅस्पिटल रिसर्च सेंटर (धनकवडी), सूर्या सह्याद्री हाॅस्पिटल, जहांगिर हाॅस्पिटल, रुबी हाॅल क्लिनिक, डाॅ. डी. वाय. पाटील हाॅस्पिटल (पिंपरी), संचेती हाॅस्पिटल, अपाेलाे हाॅस्पिटल (शंकरशेठ रस्ता) येथे माेफत वैद्यकीय सेवा उपलब्ध हाेत आहे. गणपती मंदिराजवळ राज्य उपसंचालक आराेग्य सेवा पुणेतर्फे 24 तास माेफत व्हेंटिलेटर, आयसीयू 10 खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सार्वजनिक आराेग्य विभागाच्या वतीने 108 क्रमांकाच्या 5 रुग्णवाहिका आणि ट्रस्टच्या 4 रुग्णवाहिका उत्सव काळात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात विनामूल्य कार्यरत आहेत. वैद्यकीय मदत केंद्रांवर; तसेच रुग्णवाहिकांच्या येथे माेफत औषधे देण्यात येत असून, आराेग्यविषयक सर्वताेपरी मदत भाविकांना देण्याची सुविधा ट्रस्टने उपलब्ध करून दिली आहे.