तोंडाच्या दुर्गंधीवर काही घरगुती उपाय

    23-Sep-2026
Total Views |
 
Aarogya
ताेंडाच्या दुर्गंधीचे मुख्य कारण अन्न सेवन आहे, जे थेट ताेंडातून येते. लसूण, कांदा, तिखट पदार्थ, असामान्य चवीचे पदार्थ (उदा. आमटी, रस्सा), विशिष्ट प्रकारचे चीज, मासे आणि आम्लयुक्त पेये यांसारखे काही सामान्य खाद्यपदार्थ ताेंडात दीर्घकाळ टिकणारी अप्रिय चव साेडू शकतात. याव्यतिरिक्त, इतर अन्नपदार्थ ताेंडात बराच काळ रेंगाळू शकतात आणि जंतूंच्या वाढीस चालना देऊ शकतात, ज्यामुळे ताेंडाला दुर्गंधी येते.(भाग 1)
 
जरी ताेंडाची दुर्गंधी किंवा हॅलिटाेसिस कधीकधी ताेंडाच्या अपुऱ्या स्वच्छतेमुळे निर्माण हाेऊ शकते, तरी इतर मूलभूत कारणे देखील या दुर्गंधीला कारणीभूत ठरू शकतात. दरराेज नियमितपणे दात स्वच्छ करण्याचे वेळापत्रक पाळण्याचे उपाय याेजले तरी, या समस्या साेडवणे अनेकदा आव्हानात्मक ठरते. यामुळे काही प्रमाणात अस्वस्थ वाटते, ज्यातून पुढे न्यूनगंड आणि चारचाैघात जाणे टाळण्यास कारणीभूत ठरू शकते.
 
 ्नलाेराेफिल :
्नलाेराेफिलची जैविक रचना मानवी हिमाेग्लाेबिनसारखीच असते. या दाेन जैविक घटकांमधील मुख्य फरकांपैकी एक म्हणजे मानव आणि वनस्पतींमध्ये आढळणाऱ्या लाेह आणि मॅग्नेशियम घटकांचे प्रमाण. हिमाेग्लाेबिनमध्ये लाेह असते, तर ्नलाेराेफिलमध्ये मॅग्नेशियम असते. दुर्गंधी हे सहसा माेठ्या आतड्याच्या अस्वच्छतेचे लक्षण असते आणि ्नलाेराेफिल हे दूषित घटक काढून टाकण्यास मदत करते.्न लाेराेफिलच्या गाेळ्या पॅकेजिंगवर दिलेल्या निर्देशानुसार घ्याव्यात.
 
 तुळस :
तुळशीची चार पाने भरपूर पाण्यासाेबत खा. यामुळे ताेंडाची दुर्गंधी आणि ताेंडातील फाेडांपासून निश्चितच आराम मिळेल. तुम्ही ही पाने पाण्यात उकळून त्यांचा चहादेखील बनवू शकता.
 
 लिंबाचे पाणी :
एका आठवड्यासाठी दरराेज एक ग्लास लिंबू पाणी प्या. हे लक्षात घ्यावे की लिंबू पाणी आणि लिंबू सरबत एकसारखे नसतात. यात फक्त पाण्यात लिंबाचा रस मिसळलेला असताे. हे दरराेज प्यायल्याने तुमचे ताेंड ताजे आणि स्वच्छ वाटेल.
 
 लवंग :
दिवसाचे शेवटचे जेवण झाल्यावर काही मिनिटे लवंगेच्या बिया चाेखा. यामुळे पुदिन्याप्रमाणे तुमच्या ताेंडाची दुर्गंधी दूर हाेईल. तसेच यामुळे शरीराची दुर्गंधी आणि खाेकला कमी हाेण्यासही मदत हाेते. सर्दी आणि फ्लू सारख्या श्वासाशी संबंधित प्रत्येक विषाणूसाठी लवंग खूप उपयुक्त आहे.
 
 बडीशेप :
पचनसंस्थेतील बिघाडामुळे ताेंडाला दुर्गंधी येत असावी. असे असल्यास, राेज जेवणानंतर एक चमचा बडीशेपचे सेवन करा. ताेंडाच्या समस्या आणि खाेकल्यामध्येही हे उपयुक्त ठरते. तुम्ही बडीशेपचा चहा देखील पिऊ शकता.
 
 अजमाेद :
सेलेरिआकया यूराेपीय प्रकारच्या (रॅपेशियम) मांसल मुळांचा उपयाेग सार व स्वाद यांकरिता विशेषेकरून करतात. बियांतील स्वादिष्ट तेल पदार्थास खमंगपणा आणते. भारतात या प्रकारची बागेत लागवड करितात. मुळे शामक, लघवी साफ करणारी, आराेग्य सुधारणारी, सूज व तीव्र वेदना कमी करणारी, बिया उत्तेजक, पाैष्टिक, वायुनाशी, हृदयास ताकद देणाऱ्या असतात. दमा, खाेकला, यकृतविकार, प्लीहाविकार इत्यादींवर उपयुक्त. फळांचे तेल सुगंधी द्रव्यांत वापरतात. अजमाेद हा घरगुती उपाय वापरण्याचा सर्वात साेपा मार्ग म्हणजे आपल्या जेवणात अधिक अजमाेद घालणे किंवा अजमाेदाच्या पानांपासून बनवलेला चहा पिणे.