एआय मानवतेची दिशा बदलेल : संशोधन करणारे जेकब कॉक्स

    23-Sep-2026
Total Views |

AI 
वाॅशिंग्टन, 22 सप्टेंबर (आ.प्र.)
सध्या, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) जगभरात चर्चेचा विषय बनली आहे, आणि अशा परिस्थितीत एक माेठा खुलासा झाला आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की एआय प्राणघातक ठरू शकते आणि एका दशकात ते इतके धाेकादायक बनेल की ते माेठ्या संख्येने लाेकांचा जीव घेऊ शकेल.
 
एआयवर संशाेधन करणारे जेकब काॅक्स यांनी अँथ्राेपिकमध्ये तीन वर्षे काम केल्यानंतर अखेर राजीनामा दिला आहे, त्याचबराेबर त्यांनी एआयच्या सर्वात माेठ्या धाेक्याबद्दल इशाराही दिला आहे.
 
अँथ्राेपिक या अग्रगण्य एआय कंपनीतील संशाेधक जेकब काॅक्स यांनी एक माेठा खुलासा केला आहे. एआय कंपनीत तीन वर्षे काम केल्यानंतर राजीनामा दिलेल्या जेकब यांनी संपूर्ण जगाला एआयबद्दल इशारा दिला आहे. एआय शास्त्रज्ञ जेकब यांनी म्हटले आहे की, एआयचे निर्माते स्वतःच हे मान्य करतात की या दशकाच्या अखेरीस, म्हणजेच 2030 पर्यंत, एआय पृथ्वीवरील सर्व लाेकांना नष्ट करू शकते. एआय कंपनीचे अधिकारी या विषयावर माध्यमांना वेगवेगळी निवेदने देत आहेत, तर खासगीत ते या धाेक्यावर चर्चाही करत आहेत.
 
अधिक तपशील देताना जेकब म्हणाले की, लवकरच एक अशी मानवातीत प्रणाली (सुपरह्युमन सिस्टीम) येईल जी जगातील काेणतीही प्रणाली हॅक करू शकेल. ती काेणत्याही वेळी काेणत्याही क्षेत्रात क्रांती घडवून आणू शकते किंवा पृथ्वीची शक्ती आणि संसाधने ताब्यात घेऊ शकते.
 
हा धाेका ओळखण्यात ओपनएआय (जशिपअख) अजूनही मागे आहे, तर अँथ्राेपिक (अपींहीेळिल) हा धाेका समजू शकते. जेकब यांनी एआय लॅबमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनाही इशारा दिला आणि त्यांना परिस्थिती ओळखण्याची विनंती केली.
 
साेशल मीडियावर आपल्या राजीनाम्याची घाेषणा करताना जेकब म्हणाले की, मी आज कंपनी साेडली, मी ओपनएआय आणि अँथ्राेपिक या दाेन्ही कंपन्यांमध्ये काम केले आहे.
 
एआय कंपन्या जबाबदारीने वागत नाहीत, त्या मानवी जीवाशी खेळत आहेत. जेकब यांच्या दाव्याला नंतर अँथ्राेपिकने दुजाेरा दिला. कंपनीचे अलाइनमेंट सायन्स लीड इव्हान म्हणाले की, जेकब खरे बाेलत आहेत. आम्ही हे देखील मान्य करताे की एआय सर्व मानवांना नष्ट करू शकते. असे हाेण्याची शक्यता 10 ट्न्नयांपेक्षा जास्त आहे.
 
जेकब यांनी यापूर्वी म्हटले हाेते की, एआय तंत्रज्ञानाच्या शक्तीला हलक्यात घेऊ नका, हे तंत्रज्ञान एका अतिमानवी प्रणालीमध्ये रूपांतरित हाेईल आणि काेणतीही प्रणाली हॅक करू शकेल. ते काेणत्याही क्षेत्रात राताेरात बदल घडवू शकते.
 
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा धाेका वाढत आहे आणि आता त्यावर निर्बंधही सुरू झाले आहेत. अमेरिकेत, न्यूयाॅर्कमधील सर्व सार्वजनिक शाळांमध्ये एआयच्या वापरावर बंदी घालण्यात येईल, अशी घाेषणा करण्यात आली आहे. एआय साॅफ्टवेअर मुलांच्या मानसिक आराेग्यासाठी धाेकादायक ठरू शकते, हे लक्षात घेऊन बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एआयच्या वापरास फक्त हायस्कूलमध्ये परवानगी दिली जाईल, मात्र त्यातही काही निर्बंध असतील. लहान मुलांना शाळेत लॅपटाॅप, टॅब्लेट इत्यादी फक्त मर्यादित वेळेसाठी वापरता येतील. शाळांमध्ये काेणत्याही प्रकारचा स्क्रीन टाइम 30 ते 45 मिनिटांपर्यंत मर्यादित असेल. एआयवरील निर्बंधांमध्ये सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांचा समावेश असेल.