श्री दासबोध नित्यपाठ

वरिवरी दिसे वैभवाचे । अंतरी नाना व्याधी दुःखाचे ।।२।।

    22-Sep-2026
Total Views |
 
RamdasSwami
आणि पवित्र अशा गंगामाईचे पाणी तीर्थ म्हणून घेतले तरी त्याचा काही भाग मूत्ररूपाने शरीर बाहेर टाकते. त्यामुळे अन्नापैकी काहीचे पचन आणि बाकीचे मलमूत्र विरेचन हे सत्य लक्षात घ्यावे. कारण या राेजच्या दिनक्रमानेच शरीराची वाढ हाेत असते.
 
याविषयी काेणीही शंका किंवा संशय घेण्याचे कारण नाही. मलमूत्र जर नसेल तर माणूस जिवंतही राहू शकत नाही हेही आपण पाहताे आणि मानवी देहातून ही सर्व घाण पूर्णपणे नष्ट करावयाचा प्रयत्न केला तर मनुष्य मरूनच जाईल अशी ही एकंदर देहाची विवशता आणि वाईट अवस्था आहे.
 
खरं तर मानवी देह म्हणजे अस्थिपंजर उभविला। सीरानाडी गुंडाळिला। मेदमांसे सरसाविला। सांदाेसांदी भरूनी।। असा हाडांच्या सापळ्याभाेवती शिरा, स्नायू आणि नाड्या गुंडाळल्या आहेत आणि मधे जेथे तेथे माेकळी जागा सांदीकाेपरे राहतील तेथे चरबी आणि मांसखंड भरूनच परमेश्वराने निर्माण केला आहे.
 
श्रीसमर्थांच्या या सर्व उपदेशाचा हेतू माणसाच्या मनातील त्याच्या देहाबद्दलचे प्रेम आणि आसक्ती कमी व्हावी आणि त्याने देहापुढील ठाण्याचा म्हणजे आत्म्याचा व त्याच्या उन्नतीचा विचार करावा हाच आहे आणि म्हणून ते शरीराबद्दल व शरीर उपभाेगाबद्दल परखड सत्य सांगून दुरावा निर्माण करीत आहेत.
 
- प्रा. अरुण गाेडबाेले,
माे. 9822016299