आपल्या आजूबाजूला आवाजांची कमतरता नाही. वाहनांचे हाॅर्न, बांधकाम यंत्रांचा कर्कश आवाज, कारखान्यांतील मशिनरी, लाऊडस्पीकर, फटाके, डीजे, लग्नसमारंभ, माेबाइलवरील माेठ्या आवाजात ऐकले जाणारे संगीत आणि इअरफाेनचा अतिवापरया सगळ्यामुळे ध्वनी प्रदूषण वाढत आहे. (भाग 1)
आपण अनेकदा आवाजाचा त्रास काही वेळ सहन करताे आणि नंतर ताे विसरून जाताे. मात्र कानांच्या बाबतीत हा निष्काळजीपणा महागात पडू शकताे. माेठ्या आवाजाचा वारंवार किंवा दीर्घकाळ संपर्क आल्यास कानाच्या आतील अतिसूक्ष्म संवेदनाक्षम पेशींना इजा हाेऊ शकते आणि त्यातून छेळीश-खपर्वीलशव कशरीळपस ङेीी (छखकङ) म्हणजेच ध्वनीमुळे हाेणारी श्रवणशक्ती कमी हाेण्याची समस्या निर्माण हाेऊ शकते. ही हानी अनेकदा हळूहळू हाेते आणि सुरुवातीला व्यक्तीच्या लक्षातही येत नाही.
कानात नेमके काय घडते?
आपल्या आतील कानात ‘काॅक्लिया’ नावाची रचना असते. त्यामध्ये ध्वनीचे कंपन मेंदूपर्यंत पाेहाेचविणाऱ्या अतिसूक्ष्म केसांसारख्या संवेदनाक्षम पेशी असतात. अतिशय माेठा किंवा सततचा आवाज या पेशींना आणि त्यांच्या संरचनांना नुकसान पाेहाेचवू शकताे. मानवांमध्ये या संवेदनाक्षम केसांच्या पेशी खराब झाल्यानंतर त्या नैसर्गिकरीत्या पुन्हा निर्माण हाेत नाहीत.
त्यामुळे माेठ्या आवाजामुळे झालेली श्रवणहानी कायमस्वरूपी हाेऊ शकते.
आवाज किती म्हणजे धाेकादायक?
ध्वनीची तीव्रता ङ्गडेसिबलफ (वइ)मध्ये माेजली जाते. ध्वनी किती माेठा आहे याबराेबरच ताे किती वेळ आणि किती वेळा कानावर पडताे हेही महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, सामान्य संभाषण साधारण 6070 वइ असू शकते; तर मैफिली, क्रीडा स्पर्धा किंवा जास्त आवाजात संगीत यांचा स्तर त्यापेक्षा खूप अधिक असू शकताे. 85 वइ किंवा त्यापेक्षा जास्त आवाजाचा दीर्घकाळ किंवा वारंवार संपर्क श्रवणशक्तीसाठी धाेकादायक ठरू शकताे. आवाज जितका माेठा, तितक्या कमी वेळात कानाला इजा हाेण्याचा धाेका वाढताे. एक साेपा नियम लक्षात ठेवता येईलआवाज खूप माेठा, खूप जवळचा किंवा खूप वेळ चालणारा असेल, तर ताे कानांसाठी धाेकादायक असू शकताे.
ध्वनी प्रदूषणामुळे हाेणाऱ्या प्रमुख कानांच्या समस्या
1. श्रवणशक्ती कमी हाेणे सुरुवातीला काही विशिष्ट आवाज नीट ऐकू येत नाहीत. नंतर बाेलणारे काय म्हणत आहेत हे समजण्यासाठी वारंवार विचारावे लागते. टीव्ही किंवा माेबाइलचा आवाज वाढवावा लागताे. गर्दीच्या ठिकाणी संभाषण समजणे कठीण हाेते. ही समस्या हळूहळू वाढत असल्यामुळे अनेकांना तिची जाणीव उशिरा हाेते.
2. कानात सतत आवाज येणे टिनिटस
माेठ्या आवाजाच्या संपर्कानंतर कानात गुंजारव, शिट्टी, घंटानाद किंवा ङ्गभुं-भुंफ असा आवाज ऐकू येऊ शकताे. याला टिनिटस म्हणतात. काही वेळा हा आवाज तात्पुरता असताे; परंतु वारंवार माेठ्या आवाजाच्या संपर्कामुळे टिनिटस दीर्घकाळ टिकू शकताे. काही व्यक्तींमध्ये त्यामुळे झाेप, एकाग्रता आणि मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम हाेऊ शकताे.
3. तात्पुरती श्रवणक्षमता कमी हाेणे
माेठ्या आवाजाच्या कार्यक्रमातून बाहेर आल्यानंतर कान बधिर झाल्यासारखे वाटणे किंवा आवाज अस्पष्ट ऐकू येणे अनेकांना अनुभवायला मिळते. काही वेळा ही समस्या काही काळात कमी हाेते; परंतु अशी लक्षणे वारंवार दिसत असतील तर ती कानांवर हाेणाऱ्या ताणाची सूचना असू शकते.