देशातील सर्वांत मोठी सोलर इकोसिस्टीम नागपुरात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती : उद्योजकांना केले गुंतवणुकीचे आवाहन

    22-Sep-2026
Total Views |

SolarEcosystem 
नागपूर, 21 सप्टेंबर (आ.प्र.) :
देशातील सर्वांत माेठी साेलर माॅडेल इकाेसिस्टीम नागपुरात आकार घेत आहे. येत्या दहा वर्षांत नागपूर साेलर इकाेसिस्टीमचे हब हाेणार आहे. त्यामुळे उद्याेजकांनी या क्षेत्रात माेठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अतिर्नित बुटीबाेरी औद्याेगिक क्षेत्रातील अवादा उद्याेग समूहाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली; तसेच साेलर माॅडेल निर्मितीची पाहणी केली. त्यानंतर उद्याेजकांशी संवाद साधला. अवादा उद्याेग समूहाचे संस्थापक-अध्यक्ष विनीत मित्तल यांनी मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत घेतली.
 
यावेळी राज्यातील पायाभूत सुविधा, औद्याेगिक विकास आणि मुंबईच्या भविष्यातील बदलांवर उद्याेजकांसाेबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
 
येथे स्मार्ट इंडस्ट्रीसाठी इकाेसिस्टीम तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी पन्नास ट्न्नयांपेक्षा अधिक जागा अधिकृत झाली असून, गुंतवणुकीलाही प्राेत्साहन मिळत आहे. देशातील पहिले साेलर माॅडेल अतिर्नित बुटीबाेरी क्षेत्रात तयार हाेत असून, अवादा समूहाला त्यांच्या प्रकल्पाच्या विस्तारासाठी 250 एकर जागेची आवश्यकता असून, ती देण्याची घाेषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
 
उद्याेजकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, की स्टील उद्याेगाच्या विकासाला राज्य शासन प्राेत्साहन देत आहे. उद्याेजकांना स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 2029 पर्यंत साेलर बॅटरी स्टाेरेजच्या माध्यमातून 24 तास ऊर्जा उपलब्ध हाेईल. त्यामुळे उद्याेगांना विजेचा प्रश्न राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्य्नत केला. गडचिराेली स्टील सिटी म्हणून उदयास येत असून, तेथे चार लाख काेटींची गुंतवणूक हाेणार आहे. बेल्जियमच्या कंपनीसाेबत गडचिराेलीत ग्रीन स्टील तयार करण्याचा सामंजस्य करार झाल्याचेही त्यांनी सांगितले.