नागपूरला सुव्यवस्थित शहराचे स्वरूप देणार

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन : डॉ. हेडगेवार उड्डाणपुलाचे लोकार्पण

    22-Sep-2026
Total Views |

Nagpur 
नागपूर, 21 सप्टेंबर (आ.प्र.) :
पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नागपूर शहराला सुव्यवस्थित शहराचे स्वरूप देण्याचा प्रयत्न हाेत असून, शहराच्या भविष्यातील विस्ताराच्या दृष्टीनेही व्यापक प्रमाणात प्रकल्प हाती घेण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
 
शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या आणि उत्तर, मध्य व दक्षिण नागपूरला अधिक सक्षमपणे जाेडणाऱ्या इंदाेरा-दिघाेरी उड्डाणपुलाचे लाेकार्पण मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात आले. या उड्डाणपुलाचे डाॅ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपूल असे नामकरण करण्यात आले आहे. नागपूरचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापाैर नीता ठाकरे, उपमहापाैर लीला हाथीबेड, आमदार सर्वश्री प्रवीण दटके, माेहन मते, कृष्णा खाेपडे, संजय भेंडे, माजी खासदार डाॅ. विकास महात्मे, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी महापाैर दयाशंकर तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित हाेते.
 
नागपूरमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून, पुढेही शहरात विविध प्रकल्प राबवले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
नागपुरातील हा सर्वाेत्तम उड्डाणपूल असून, त्यात सर्वाेत्तम आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे. या उड्डाणपुलामुळे वाहतूक काेंडीची समस्या माेठ्या प्रमाणात सुटणार असून, अंतर तसेच वाहतुकीला लागणारा वेळही माेठ्या प्रमाणात कमी हाेणार आहे. आगामी काळातही शहरात पायाभूत सुविधांचे प्रकल्प व्यापक प्रमाणात राबवले जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले; तसेच गडकरी यांनी आगामी काळात शहरात राबवण्यात येणाऱ्या काही याेजनांचीही माहिती दिली. बावनकुळे यांनीही मनाेगत व्य्नत केले.