पुणे म्हाडाच्या ४ हजार ४६२ घरांची सोडत २६ नोव्हेंबरला

अर्जासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत : पुणे, पिंपरीत सर्वाधिक घरे

    22-Sep-2026
Total Views |
 
MHADA
मुंबई, 21 सप्टेंबर (आ.प्र.) :
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) 4462 सदनिकांच्या साेडतीची तारीख पुढे ढकलण्यात आली असून, आता 26 नाेव्हेंबरला साेडत काढण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 15 ऑक्टाेबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने साेडतीचे संपूर्ण वेळापत्रकही बदलले आहे. यशस्वी अर्जदारांची नावे त्याचदिवशी सायंकाळी 6 वाजता संकेत स्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहेत. यात पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक सदनिका आहेत.
 
पुणे मंडळातर्फे 15 ट्नके सामाजिक गृहनिर्माण आणि 20 ट्नके सर्वसमावेशक गृहनिर्माण याेजनांतील सदनिकांच्या वितरणासाठी 24 ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली हाेती
.
त्यानुसार ऑनलाइन अर्जासाठी सुरुवातीला 15 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली हाेती. मात्र, अनेक अर्जदारांना कागदपत्रांच्या ऑनलाइन पडताळणीच अडचणी येत असल्याने अर्जाची मुदत एका महिन्याने वाढवून 15 ऑक्टाेबर करण्यात आली. अर्जदारांना आर्थिक वर्ष 2024-25 किंवा 2025-26 या दाेन वर्षांपैकी काेणत्याही एका वर्षाचा उत्पन्न दाखला अथवा प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.
 
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 15 ऑक्टाेबरला सायंकाळी 5 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ऑनलाइन अनामत र्नकम त्याच दिवशी रात्री 11:59 पर्यंत, तर आरटीजीएस अथवा एनईएफटीद्वारे 16 ऑक्टाेबरला दुपारी 3 पर्यंत भरता येईल. स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी 12 नाेव्हेंबरला सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध हाेईल. त्यावर 14 नाेव्हेंबरला सायंकाळी 5 पर्यंत दावे-हरकती नाेंदवता येणार आहेत. स्वीकृत अर्जांची अंतिम यादी 20 नाेव्हेंबरला सायंकाळी 7 वाजता जाहीर केली जाईल.
 
सदनिकांची साेडत 26 नाेव्हेंबरला काढण्यात येणार असून, यशस्वी अर्जदारांची नावे त्याचदिवशी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध केली जातील. या साेडतीत एकूण 4462 सदनिका उपलब्ध आहेत. त्यात 20 ट्नके सर्वसमावेशक गृहनिर्माण याेजनेंतर्गत 2971, तर 15 ट्नके सामाजिक गृहनिर्माण याेजनेंतर्गत 1491 सदनिकांचा समावेश आहे.
 
पुणे महापालिका क्षेत्रात 1468, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात 1406 आणि पीएमआरडीए क्षेत्रात 1588 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गेल्या दाेन साेडतींत शिल्लक राहिलेल्या 558 सदनिकांचाही यात समावेश आहे.