अधिकाऱ्यानी उद्दिष्टपूर्ती करावी; अन्यथा कारवाई : अग्रवाल

महावितरणचे कार्यकारी संचालक दिनेश अग्रवाल यांचा इशारा

    22-Sep-2026
Total Views |
 
Veej
पुणे, 21 सप्टेंबर (आ.प्र.) :
काळ बदलला आहे. त्यामुळे यापुढे कामाचा रिझल्ट अपेक्षित आहे. उद्दिष्टपूर्ती झाली नाही तर कारवाईला सामाेरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा महावितरणचे कार्यकारी संचालक दिनेश अग्रवाल यांनी पुणे परिमंडलातील अधिकाऱ्यांना दिला. सप्टेंबरअखेर चालू वीजबिलासाेबत अतिर्नित 682 काेटी थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट त्यांनी दिले.
 
महावितरणने पुणे व बारामती परिमंडलाचे पालकत्व अग्रवाल यांच्याकडे साेपवले आहे. पालक संचालक म्हणून अग्रवाल यांनी रास्ता पेठेत पाॅवर हाऊस येथे पुणे परिमंडलातील वसुली, वीजगळती आणि कामगिरीचा आढावा घेतला. या बैठकीला प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, सुरेश सवाईराम, सहायक महाव्यवस्थापक कीर्ती भाेसले यांच्यासह पुणे परिमंडलातील सर्व विभागांचे कार्यकारी अभियंते, अधिकारी उपस्थित हाेते.
 
सप्टेंबरच्या चालू देयकासह पुणे परिमंडलाने 1254 काेटींची वसुली करणे अपेक्षित हाेते. मात्र, आतापर्यंत 571 काेटींची वसुली झाली असून, अद्याप 682 काेटी वसूल करणे बाकी आहे. ही संपूर्ण र्नकम पुढील 10 दिवसांत वसूल करण्याच्या स्पष्ट सूचना अग्रवाल यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या. वसुलीसह वीजचाेरीविराेधी माेहीम आणखी तीव्र करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ग्राहकसेवा, वीजपुरवठ्याची गुणवत्ता, वसुली आणि वीजगळती कमी करण्याचे सकारात्मक परिणाम दिसले पाहिजे, असे अग्रवाल यांनी सांगितले.