इंदापूर, 21 सप्टेंबर (आ.प्र.) :
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते भरणेवाडीत महिला शेतकरी पाेर्टलचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील महिला शेतकऱ्यांना शासकीय याेजना, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा, विस्तार सेवा तसेच विविध कल्याणकारी याेजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम-2026 अंतर्गत महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत महिला शेतकऱ्यांना मान्यता देणे, त्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देणे आणि अधिकृत डेटाबेस तयार करण्यासाठी हे पाेर्टल तयार करण्यात आले आहे. यावेळी कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, आयु्नत सूरज मांढरे, संचालक उदय देशमुख उपस्थित हाेते.
राज्यातील महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय याेजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रासाठी हीींिीं://ज्ञीळीहळ.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या संकेत स्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित अर्ज ग्रामसभा किंवा नगर पंचायतीच्या विशेष सभेसमाेर ठेवण्यात येईल. अर्जदार महिलेने अधिनियमात नमूद केलेल्या शेती अथवा शेतीसंबंधित कामांमध्ये सहभाग असल्याबाबत सभेत विचार करण्यात येईल.