संध्यानंद.काॅम
देशात फिटनेस केवळ जिमची ट्रेडमिल आणि डंबलपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. माॅल, नाइट ्नलब, कॅफे, रूफटाॅप आणि माेकळी सार्वजनिक ठिकाणेसुद्धा व्यायामाची नवीन ठिकाणे हाेत आहेत.
परदेशांमध्ये असलेले हाय-इंटेंसिटी इंटरव्हल ट्रेनिंग (एचआयआयटी) सारखे ट्रेंड दिल्ली-एनसीआरच्या ‘वर्कआउट पार्टी’ आणि ‘वेलनेस सनसेट’ मध्ये बदलले आहेत. हा ट्रेंड आता भाेपाळ, इंदाैर, जयपूर, लखनऊ आणि काेयंबतूर अशा शहरांपर्यंत पाेहाेचला आहे. याचे माेठे कारण हे आहे की, नवी पिढी फिटनेसला केवळ बाॅडी बनविण्याचे माध्यम नाही, तर एक सामाजिक अनुभव मानत आहे. डिजिटल जगातील वाढता एकटेपणा यांच्या मध्ये असे आयाेजन लाेकांना ऑफलाइन भेटणे आणि नवीन मित्र बनविण्याची संधी सुद्धा देत आहे.
साेशल मीडिया, फिटनेस अॅप्स, रनिंग ्नलब आणि ई-काॅमर्सने या संस्कृतीचा वेगाने प्रसार केला आहे. फिटनेस आता कम्युनिटी, लाइफस्टाइल आणि अनुभव यांचा भाग हाेत आहे.
या फिटनेस पार्ट्यांमध्ये काय हाेते? सुरुवात सर्वसाधारणपणे याेग, पिलाटीज, जुम्बा, स्पिनिंग, रनिंग असे व्यायामप्रकार किंवा हाय इंटेंसिटी इंटरर्व्हल ट्रेनिंग अशा ग्रुप वर्कआउटने हाेते. सेशन समाप्त झाल्यानंतर डीजे म्युझिक, लाइव्ह परफाॅर्मन्स, स्नॅ्नस, काॅफी आणि साेशल म्निसरचे आयाेजन केले जाते. अनेक ठिकाणी सूर्याेदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी ओपन-एअर फिटनेस सेशन ठेवली जातात. तर काही ्नलब रात्रीच्या पार्ट्यांच्या जागी ‘वेलनेस रेव्ह’ आयाेजित करत आहेत.