पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

१८.६ टन निर्माल्य संकलित : बायो-कंपोस्टिंग प्रकल्पात होणार निर्माल्यावर प्रक्रिया

    21-Sep-2026
Total Views |
 
Thane
ठाणे, 20 सप्टेंबर (आ.प्र.) :
गणेशाेत्सवात निर्माल्य जलस्राेतांमध्ये जाण्यापासून राेखण्यासाठी महापालिकेने केलेल्या व्यवस्थेला ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दीड दिवसाच्या 20703 गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर 18600 किलाे निर्माल्य संकलित करण्यात आले असून, या निर्माल्यावर शास्त्राे्नत पद्धतीने प्रक्रिया केली जात आहे. त्यातील प्लॅस्टिकही वेगळे करून स्वतंत्रपणे विल्हेवाट लावली जाणार आहे.
 
ठाणे शहरात 132 ठिकाणी महापालिकेने विसर्जनाची व्यवस्था केली आहे. खाडीघाट, कृत्रिम तलाव, विसर्जन टाक्या आणि फिरती विसर्जन व्यवस्था अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तेथे नागरिकांनी गणेश विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेने केले हाेते. या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा ठाणेकरांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला माेठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे दिसून येते.
 
आता गणेशाेत्सवात निर्माल्य जलस्राेतांमध्ये जाण्यापासून राेखण्यासाठी महापालिकेने केलेल्या व्यवस्थेलाही ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
 
गणेशाेत्सवादरम्यान संकलित हाेणाऱ्या निर्माल्याचे शास्त्राे्नत पद्धतीने व्यवस्थापन करण्यात येणार आहे. 15 सप्टेंबरला दीड दिवसाच्या कालावधीत 20703 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले असून, सुमारे 18600 किलाे निर्माल्य संकलित करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
 
या निर्माल्याचे विकेंद्रीत पद्धतीने व्यवस्थापन करण्यात येत आहे. हिरानंदानी इस्टेट, ऋतू पार्क; तसेच काैसा येथील मेकॅनिकल बायाे-कंपाेस्टिंग प्रकल्पांत शास्त्रा्नत पद्धतीने निर्माल्यावर प्रक्रिया केली जात आहे. संकलित निर्माल्यात साधारणपणे 3 ट्नके प्लॅस्टिक पिशव्यांचे प्रमाण आढळून आले आहे. हे प्लास्टिक निर्माल्यापासून वेगळे करून त्याची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावण्यात येत असून, त्याचे व्यवस्थापन एमआरएफ सेंटरमध्ये करण्यात येत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.