नागपूर शहरातील सर्व विकासकामे मार्चअखेर पूर्ण करा : मुख्यमंत्री फडणवीस

    21-Sep-2026
Total Views |
 
CMFadanvis
नागपूर, 20 सप्टेंबर (आ.प्र.) :
नागपूर शहरात अमृत-2 अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे मार्चपर्यंत गतीने आणि गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
 
शहरात अमृत-2 याेजनेंतर्गत सुरू असलेली विकासकामे आणि पाेहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन व पुनरुज्जीवन या महत्त्वाच्या विषयांवर रामगिरी शासकीय निवासात आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बाेलत हाेते. यावेळी आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, महापालिका आयु्नत डाॅ. विपीन इटनकर, अतिर्नित आयु्नत अंकित, मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी आशा पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता नीता ठाकरे, महापालिकेच्या मुख्य अभियंता लीना उपाध्ये, नगरसेवक; तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.
 
बैठकीदरम्यान शहरात सुरू असलेल्या रस्ते खाेदकाम व त्यानंतरच्या पुनर्भरण कामांचा आढावा घेण्यात आला. नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागांतील खाेदकाम व पुनर्भरणाच्या कामांबद्दल समस्या मांडल्या; तसेच रिंगराेडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सुरू असलेल्या कामांबद्दलही काही मुद्दे मांडण्यात आले.