चाणक्यनीती

    21-Sep-2026
Total Views |

Chankya 
2. अज्ञानी व्य्नती ः अज्ञानी व्य्नतीला ना जास्तीचे धन कमवता येते, ना समाजात मान्यता मिळते.
माेलमजुरीची, अत्यंत कष्टाची कामे करून दारिद्र्यात, हलाखीत, राेगराईत, वैफल्यग्रस्त हाेऊन जगावे लागते; त्याचा अंतही लवकरच हाेताे.
 
3. सेनापतीशिवाय सेना ः सेनानायक हा नेहमीच समाेर असताे; ताे असताे म्हणून सेनाही जाेशाने लढते.
हे एक मैदानी मानसशास्त्र आहे. ‘लढा, मारा !’ अशा घाेषणांशिवाय सेना निष्प्रभ असते. साध्या सभेत आपण पाहताे एकाने टाळी वाजवली की, दुसरा, तिसरा, सारेच टाळ्या वाजवतात. एकाने अंडे, टमाटे फेकले तर बाकीचेही त्याचेच अनुकरण करतात.