महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य, खरेदी दालनांत दिल्लीकरांची झुंबड

    21-Sep-2026
Total Views |
 
Ganeshotsav
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर (आ.प्र.) :
राजधानी दिल्लीतील काेपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशाेत्सवाला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताे आहे. श्री गणरायाच्या दर्शनासाठी राेज शेकडाे भाविकांची उपस्थिती लाभत असून, संपूर्ण परिसर भ्नितमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाेबतच सदनात उभारण्यात आलेली खाद्य, कला व प्रदर्शन-विक्री दालने नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहेत.
 
चव महाराष्ट्राची अंतर्गत पुरणपाेळी व उकडीचे माेदक, काैशल्याला सलाम उपक्रमांतर्गत दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू; तसेच महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचा अनाेखा ठेवा या उपक्रमातील पैठणी, माहेश्वरी व इरकल साड्यांच्या दालनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय महिला बचत गटांनी तयार केलेले चकली पीठ, ढाेकळा पीठ, बारीक शेव, शेवभाजीसाठीची शेव आणि चिवडा; तसेच वडापाव, चादरी आणि बांबू टाॅवेल यासारख्या विविध वस्तूंचे प्रदर्शन-विक्रीही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. या उपक्रमांतून महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबराेबरच महिला सक्षमीकरणाला प्राेत्साहन मिळत आहे.
 
गणेशाेत्सवाची सांगता 25 सप्टेंबरला हाेणार असून, दुपारी 3 ते सायंकाळी 7.30 या वेळेत जुन्या महाराष्ट्र सदनातून झांज पथकासह ‘श्रीं’ची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. उत्सवातील सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, काही माेजक्या कार्यक्रमांसाठी ऑनलाइन नाेंदणी बंधनकारक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.