संध्यानंद.काॅम
आपल्यासमाेर दरराेज नवीन आव्हाने उभी राहतात. अशा परिस्थितीत तणावाखाली असताना, लाेक अनेकदा आक्रमक हाेतात किंवा पूर्णपणे खचून जातात. अशा परिस्थितीत, केवळ कठाेर परिश्रम पुरेसे नसतात. आव्हानांना प्रभावीपणे सामाेरे जाण्यासाठी मानसिक लवचिकता आवश्यक आहे. याविषयी...
पाण्यासारखे लवचिक बना
येल स्कूल ऑफ मेडिसिनमधील ट्राॅमा सायकाॅलाॅजिस्ट (आघात मानसशास्त्रज्ञ) प्राध्यापक जाॅन एम. कुक यांच्या अलीकडील संशाेधनानुसार, आजच्या बदलत्या काळात, जर तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहायचे असेल, तर तुम्हाला ‘लाेखंडासारखे कठीण’ नव्हे, तर ‘पाण्यासारखे लवचिक’ बनण्याची गरज आहे.
परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता हवी विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर, याला ‘मानसिक लवचिकता’ किंवा बाैद्धिक लवचिकता म्हणतात. जे लाेक परिस्थितीनुसार आपल्या विचारांमध्ये बदल करण्याची क्षमता ठेवतात, त्यांना नैराश्य आणि चिंता हाेण्याची शक्यता कमी असते, संशाेधनात दिसून आले. याचा अर्थ, तणावाखाली असताना आपले विचार, भावना आणि प्रतिक्रिया पटकन बदलण्याची क्षमता असणे.
तणावात अडकून राहू नका
मानसिक लवचिकता म्हणजे काय आणि ती महत्त्वाची का आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. मानसिक लवचिकतेचा अर्थ हाेताे, गरजेनुसार आपल्या विचारांमधील, भावनांमधील आणि वर्तनातील बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता असणे. जेव्हा तणाव निर्माण हाेताे, तेव्हा मन एकाच साच्यात अडकून राहत नाही.
कठीण काळात खचून जात नाही
मानसशास्त्रज्ञ प्रा. जाॅन एम. कुक यांच्या मते, तणावाचा विचार करण्याची, भावना अनुभवण्याची आणि त्याचा सामना करण्याची आपली क्षमताच आपल्याला कठीण काळातही खचून जाण्यापासून वाचवते.
नकारात्मक विचार आल्यावर थाेड्यावेळ शांत राहा
याचा अर्थ असा की, जेव्हा कधी तुमच्या मनात नकारात्मक विचार किंवा दुःख येते, तेव्हा त्याच्याशी लढण्याऐवजी किंवा त्याला जबरदस्तीने बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, ते स्वीकारा. शांत राहा आणि पुढचे पाऊल उचला.
मानसिक लवचिकता विकसित करता येते
मानसशास्त्रज्ञ सायमन रेगाे यांच्या मते, मानसिक लवचिकता ही शारीरिक लवचिकतेसारखीच असते. ती विकसित केली जाऊ शकते.
जितके ताठर राहाल, तितका जास्त त्रास हाेईल :
तज्ज्ञ माँटेफिओर मेडिकल सेंटरचे मुख्य मानसशास्त्रज्ञ साइमन रेगाे यांनी सांगितले की, मानसिक लवचिकता ही शारीरिक लवचिकतेसारखीच आहे.
ते म्हणतात, जेव्हा आपण या विचाराने पछाडलेले असताे की, आयुष्य फक्त एकाच साच्यात चालले पाहिजे किंवा आपले मत नेहमीच बराेबर असते, तेव्हा आपल्या समस्या वाढतात. जे परिस्थितीशी जुळवून घेतात ते प्रत्येक संकटावर मात करतात. प्राध्यापक कुक अनेकदा त्यांच्या रुग्णांना अमेरिकन उद्याेगपती हेन्री फाेर्ड यांच्या एका उ्नतीची आठवण करून देतात : तुम्ही जे नेहमी करत आला आहात, तेच करत राहिल्यास तुम्हाला तेच मिळेल जे तुम्हाला नेहमी मिळत आले आहे. त्यामुळे, आपल्या जुन्या सवयी आणि कार्यपद्धती बदलणे महत्त्वाचे आहे.