नवी दिल्ली, 18 सप्टेंबर (वि.प्र.) :
हिवाळा सुरू हाेताच भारतीय शहरांमध्ये उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रमाण माेठ्या प्रमाणात वाढते. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात कचरा जाळण्याच्या घटना, जाळल्या जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण आणि त्यातून हाेणारे प्रदूषण जवळपास तीन पटीने वाढत असल्याचे एका अभ्यासातून समाेर आले आहे.
‘वर्ल्ड रिसाेर्सेस इन्स्टिट्यूट (थठख) इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या अभ्यास अहवालात ही बाब नाेंदविण्यात आली आहे. विशेषतः पावसाळा संपल्यानंतर तापमान घसरू लागते आणि वातावरणातील हवा तुलनेने स्थिर हाेते. त्यामुळे धूर आणि प्रदूषक हवेत सहज विरळ हाेत नाहीत. परिणामी हिवाळ्यात वायुप्रदूषणाची समस्या आणखी तीव्र हाेते.
11 प्रदूषित शहरांचा अभ्यास देशातील 11 प्रदूषित शहरांमध्ये 2019 ते 2026 या कालावधीत करण्यात आलेल्या प्रत्यक्ष पाहणी आणि सर्वेक्षणाच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला. मात्र, अभ्यासात समाविष्ट शहरांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
अभ्यासानुसार, 5 लाख ते 50 लाख लाेकसंख्या असलेल्या टियर-2 शहरांमध्ये जाळल्या जाणाऱ्या कचऱ्याचे एकूण प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले.
मात्र, कचरा जाळण्याच्या घटनांच्या संख्येचा विचार केला तर हिवाळ्यात टियर-3 शहरांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक हाेते. या शहरांमध्ये दरराेज प्रति चाैरस किलाेमीटर सरासरी 49.6 ठिकाणी कचरा जाळला जात असल्याचे नाेंदविण्यात आले.
टियर-2 शहरांमध्ये हे प्रमाण 46, तर टियर-1 शहरांमध्ये 39.4 इतके हाेते.
शहराच्या एकूण प्रदूषणात वाटा कमी, पण आराेग्याचा धाेका माेठा शहरांमधील एकूण धूलिकण प्रदूषणासाठी उघड्यावर कचरा जाळणे हे प्रमुख कारण नसल्याचेही अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
संबंधित शहरांमधील एकूण झच2.5 आणि झच10 उत्सर्जनात त्याचा वाटा एक टक्क््यापेक्षाही कमी आढळला. मात्र, त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण कचरा प्रामुख्याने घरे, रस्ते आणि कचरा डेपाेच्या जवळच जाळला जाताे.
त्यामुळे आसपास राहणाऱ्या नागरिकांना विषारी धुराचा थेट आणि अधिक तीव्र सामना करावा लागताे. कमी कालावधीसाठी का हाेईना, अशा धुराच्या संपर्कात येण्याचा धाेका वाढताे.
गरीब वस्त्यांमध्ये कचरा जाळण्याचे प्रमाण चिंताजनक या अभ्यासातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कचरा जाळण्याचा थेट संबंध परिसराच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीशी असल्याचे दिसून आले. उच्च उत्पन्न गटाच्या वस्त्यांच्या तुलनेत गरीब वस्त्यांमध्ये उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या अधिक हाेते. टियर-2 शहरांतील गरीब वस्त्यांमध्ये हिवाळ्यात तर हे प्रमाण सर्वाधिक नाेंदविण्यात आले. येथे दरराेज प्रति चाैरस किलाेमीटर जवळपास 84 ठिकाणी कचरा जाळण्याच्या घटना आढळल्या. संशाेधकांच्या मते, या आकडेवारीतून गरीब आणि तुलनेने समृद्ध भागांमधील कचरा संकलन आणि अन्य महापालिका सेवांमधील विषमता स्पष्ट हाेते. ज्या भागांत नियमित कचरा उचलला जात नाही किंवा नागरी सुविधा अपुऱ्या आहेत, तेथे कचरा उघड्यावर जाळण्याकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे या अभ्यासातून अधाेरेखित झाले आहे.