चाणक्यनीती

    19-Sep-2026
Total Views |
 
Chankya
वाच्यार्थ : विनियाेगाशिवाय ज्ञान, अज्ञानाने व्य्नती, सेनापतीविना सेना आणि पतीशिवाय स्त्रिया नष्ट हाेतात.
 
भावार्थ : येथे कशाला कशाने अर्थ प्राप्त हाेताे, ते चाण्नयांनी सांगितले आहे.
 
1. क्रियाहीनाचे ज्ञान ः ज्ञान मिळविल्यानंतर ते कुठेतरी वापरावे लागते, अमलात आणावे लागते. त्याचा पुनःपुन्हा सराव करण्यासाठी लेखन करावे लागते; इतरांना ते द्यावे लागते. ज्ञानाचा काेणत्या प्रकारे ‘उपयाेग’ न केल्यास ते नष्ट हाेते, विस्मृतीत जाते. उदा. वैद्यकशास्त्राचे ज्ञान घेतलेल्या व्य्नतीने जर नियमितपणे आजारी व्य्नती, राेगी यांची तपासणी करून त्यांचे राेगनिदान केले नाही, त्यावरील औषधी सांगितली नाही तर ताे केवळ नावापुरताच ‘वैद्य’ राहताे. त्याचे सगळे ज्ञान व्यर्थ जाते.